मुलगा आणि मुलगी अशा समानतेच्या कितीही गोष्टी केल्या तरी प्रत्येकवेळी ही समानता जुळून येईलच असे नाही. तरीही अलीकडच्या काळात व्यवसाय असो वा नोकरी किंवा खेळ अशा अनेक क्षेत्रात ही समानता बऱ्याच अंशी यायला लागली आहे. इंग्रजांची देण असलेल्या क्रिकेटमध्ये असलेला मुलांचा वरचष्मा बाजूला सारत मुलीही तेवढय़ाच ताकदीने या खेळात रमल्या आहेत. हीच ताकद आता पतंगोत्सवातसुद्धा बऱ्यापैकी दिसू लागली आहे. गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रगती पाटील आयोजित करीत असलेल्या पतंगोत्सवातील महिला आणि मुलींच्या वाढत्या सहभागावरून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रगती पाटील यांच्या घरापासून ही सुरुवात झाली. ‘भाऊ पतंग उडवतो, मग मी का नाही.?’ असा निरागस प्रश्न मुलीने विचारला आणि मुलींनीही पतंग का उडवू नये, त्यांना पतंग उडवण्याची संधी कधी मिळणार, असे त्यांनाही वाटायला लागले. त्यातूनच त्यांनी आजूबाजूच्या महिलांना पतंग उडवण्यासाठी विचारले आणि २००७ साली रविनगरच्या मैदानावर पतंगोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिलांचा सहभाग होता, पण पुढेपुढे तो वाढत गेला. मग त्यातूनच पतंगोत्सव साजरा करण्यासोबतच वेगवेगळया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये उत्कृष्ट वेशभूषेसोबतच मांजाची चक्री पकडणे, मांजाचा दोर उडवणे यासारख्या स्पर्धाचा समावेश होता.
हा पतंगोत्सव म्हणजे नुसते ‘शो’बाजी नव्हते तर पतंग उडवण्यात सहभागी महिला आणि मुलींना त्याचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले. त्यामुळे ही स्पर्धा दिवसागणिक आणखीच रंगत गेली. महिला आणि विशेषत: मुलींचा यातील सहभाग अधिक वाढत गेला. मुली आणि महिला फार उंच पतंग उडवू शकत नाही, म्हणूनच मोकळया मैदानावर डीजे आणि खाद्यपदार्थाच्या साथीने हा प्रयोग अधिक रंगत चालला आहे. गाण्यांच्या तालावर ताल धरत पतंग उडविण्यात आता त्यासुद्धा तरबेज झाल्या आहेत. यावर्षी ही संख्या आणखी वाढल्यामुळे रविनगर मैदानावरचा हा पतंगोत्सव आता शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

पतंगोत्सव वाढवण्यासाठी प्रयत्न
मांजा आणि पतंग तयार करणाऱ्या गरीब व छोटय़ा व्यावसायिकांचे या मैदानावर स्टॉल लावले जातील. पतंग उडवणाऱ्या महिला आणि मुली त्यांच्याकडूनच पतंग व मांजा खरेदी करतील. यामुळे त्या गरीब व्यावसायिकांनासुद्धा या पतंगोत्सवाच्या माध्यमातून काही मदत करता येईल. या उद्देशानेच यावर्षीपासून ही नवी सुरुवात करण्यात येत असल्याचे प्रगती पाटील यांनी सांगितले. एक दिवसाचा हा पतंगोत्सव आता कमी पडायला लागल्याने आणखी दोन दिवस तो वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्या म्हणाल्या.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय