22 October 2020

News Flash

राष्ट्रीय कबड्डीपटूचे कुटुंबीय मदतीच्या अन्नावर जगताहेत!

शुभमचे वडील रिक्षाचालक तर आई कपडे धुण्याचे काम करते.

शुभम बावणे

आईवडिलांवर बेरोजगारीची वेळ; सहा हजार रुपयांची नोकरीही गेली

टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. या दुष्टचक्रातून खेळाडूही सुटलेले नाहीत. नागपूरचा राष्ट्रीय कबड्डीपटू शुभम बावणे याच्या परिवारावरही मदतीच्या अन्नावर जगण्याची वेळ आली आहे.

करोनामुळे ओढावलेल्या बेरोजगारीमुळे अनेकांना आता दोन वेळच्या अन्नासाठीही संघर्ष करावा लागत आहे. यामध्ये शालेय राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणाऱ्या शुभम बावणेही आहे. शहरातील एकलव्य क्रीडा मंडळाचा हा खेळडू गेल्या १२ वर्षांपासून कबड्डी खेळतो. त्याने राष्ट्रीय शालेय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले असून ज्युनियर, सबज्युनियर कबड्डी स्पर्धा गाजवल्या आहेत. मात्र सध्या क्रीडा स्पर्धा आणि सराव बंद असल्याने तो घरी आहे. शुभमचे वडील रिक्षाचालक तर आई कपडे धुण्याचे काम करते. मात्र सध्या टाळेबंदी असल्याने वडील दोन महिन्यांपासून घरीच आहेत. आईचाही रोजगार हिरावला आहे. हातचा पसा संपला असून गेल्या महिन्याभरापासून ते समाजसेवी संस्थेकडून मदतीने जगत आहेत. याशिवाय प्रो-कबड्डीपटू शशांक वानखेडेने त्याला मदत केली आहे.

जुनी शुक्रवारी येथे दोन खोल्यांच्या छोटय़ा घरात राहणाऱ्या शुभमला आता क्रीडा मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. शुभम  बारावीचा विद्यार्थी असून त्याचे शिक्षण सुरू आहे.

शहरात शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने त्याने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शेलूबाजार या गावातील लक्ष्मीचंद शाळेत प्रवेश मिळवला आहे. शुभमने काही काळ सहा हजार रुपयांची नोकरी केली असून ती देखील टाळेबंदीमुळे गमावली आहे. आता त्याला आपल्या परिवाराची चिंता सतावत आहे. शुभमने सर्वदूर विदर्भात तसेच गेल्यावर्षी मुंबई येथे झालेल्या सीएम चषक स्पध्रेतही आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत खेळण्याची इच्छ असलेल्या शुभमला आता  मदतीची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:22 am

Web Title: family of the national kabaddi player is living on food of help abn 97
Next Stories
1 ऑनलाईन ‘लेसन’ ऐवजी पोटासाठी रेशन द्या!
2 श्रमिक विशेष गाडीत बाळाचा जन्म
3 धावत्या एसटी बसमध्ये मद्यपार्टी; दोघे निलंबित
Just Now!
X