22 November 2019

News Flash

नवविवाहित सुनेवर बलात्कार

सुनेला कावीळची लागण झाली. एकाने जवळच्या गावात एक वैद्य उत्तम उपचार करीत असल्याचे सांगितले.

नागपूर :  दोन महिन्यापूर्वी घरी सून म्हणून आलेल्या महिलेला कावीळ झाली. सासऱ्याने तिला उपचाराच्या बहाण्याने बाहेरगावी नेले.  परत येताना  शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी उघडकीस आली.

सुनेला कावीळची लागण झाली. एकाने जवळच्या गावात एक वैद्य उत्तम उपचार करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपीने १४ जून रोजी  सुनेला सोबत घेऊन वैद्याचे गाव गाठले. मात्र, त्याची भेट झाली नाही. परत

येताना   सुनेला शेतावर नेले. आणि झोपडीत तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली. सुनेने या घटनेची वाच्यता केली नाही.

१६ जून रोजी घरात कुणी नसल्याचे बघत  पुन्हा सुनेवर बलात्कार केला. त्यानंतर तिने हा प्रसंग तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह इतर मंडळींनी घरी बैठक घेऊन हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. मात्र, कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यामुळे सुनेच्या आई-वडिलांनी पोलीस  ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

First Published on June 25, 2019 1:56 am

Web Title: father in law rapes daughter in law in nagpur
Just Now!
X