मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असं विचारत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी आम्ही जे बोलतो ते करतो. आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं म्हटलं. आमच्या सरकारनं दिलेली कर्जमाफी ही विरोधकांना बघवली नाही म्हणून त्यांनी सभात्याग केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी शेतकरी कर्जमाफीसाठी कोणत्याही प्रकराचे अर्ज भरण्याची गरज नाही. तसंच कोणत्याही अटी शर्थी ठेवण्यात आलेल्या नाहीत. कोणालाही हेलपाटे घालण्याची गरजही नाही. आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो, असं पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल. सर्व माहिती एकत्र केल्यानंतर कर्जमाफीचा आकडा समोर येईल. उद्धव ठाकरे यांनी जो पुढाकार घेतला आहे, त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. विरोधी पक्षानंही त्यांच्या निर्णयाचं अभिनंतन करायला हवं होतं. परंतु विरोधी पक्ष विनाकारण त्यात काही ना काही शोधून बहिष्कार टाकत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असं विचारत सभात्याग केला.