27 May 2020

News Flash

करोनामुळे महावितरणची आर्थिक कोंडी

ऑनलाईनने ३ ते ४ हजार कोटींचा महसूल महावितरणकडे गोळा होतो.

संग्रहित छायाचित्र

राज्यभरातील देयक स्वीकार केंद्रे बंद; रोज ४० कोटींच्या महसुलावर परिणाम

महेश बोकडे

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महावितरणने राज्यातील सर्व वीज देयक स्वीकार केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे महावितरणला रोज ४० ते ५० कोटींचा महसूल कमी मिळत आहे. महावितरणला बहुतांश विजेची खरेदी रोखीने करावी लागत असताना देयकापोटीची रक्कम येण्याचा ओघ कमी झाल्याने कंपनीची वीज खरेदीबाबत आर्थिक कोंडी होणार आहे.

मुंबईचा काही भाग वगळता राज्यात महावितरणकडून सुमारे २.६० कोटी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. महावितरणला वीज देयकापोटी मिळणाऱ्या महसुलात सुमारे ६० टक्के रक्कम ही ऑनलाईन तर इतर ४० टक्के रक्कम ही रोख किंवा धनादेशातून मिळते. ती स्वीकारण्यासाठी महावितरणने राज्यात २,४०० वीज देयक स्वीकार केंद्रे सुरू केली आहे. त्यापैकी काही केंद्रे सहकारी व को-ऑपरेटिव्ह बँक, सोसायटीमध्ये तर इतर खासगी स्तरावरही दिले गेले आहेत. या देयक स्वीकार केंद्रावर महिन्याला सुमारे १,२०० ते १,५०० कोटी रुपयांचा महसूल महावितरणला देयकापोटी मिळतो. ऑनलाईनने ३ ते ४ हजार कोटींचा महसूल महावितरणकडे गोळा होतो.

दुसरीकडे महावितरणला प्रत्येक महिन्याला वीज खरेदीपोटी विविध वीज निर्मिती कंपन्यांना सुमारे ४ ते ५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात तर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध कंत्राटदारांना विविध कामापोटी सुमारे ४०० कोटी रुपये अदा करावे लागते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हे देयक स्वीकार केंद्र हळूहळू बंद होणे सुरू झाले. २८ मार्चपासून ते पूर्ण बंद झाले.

बँक रोख घेत नसल्याचा परिणाम

राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्मचारी कमी केल्याने येथे महावितरणच्या विविध देयक स्वीकार केंद्रात गोळा होणारी रक्कम स्वीकारली जात नव्हती. दुसरीकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्येही करोनाची भीती होती. त्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले.

महावितरणकडून ग्राहकांना ऑनलाइन देयक भरण्याचा पर्याय दिला आहे. ग्राहकांनी तो स्वीकारल्यास महावितरणला देयकाची रक्कम मिळून आर्थिक अडचण दूर होऊ शकेल.

– स्वाती व्यवहारे, संचालक (वित्त) महावितरण, मुंबई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 1:04 am

Web Title: financial leakage of mahavitaran due to corona abn 97
Next Stories
1 ऑनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
2 ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून करोनाशी लढाई
3 ‘करोना’मुळे मजुरांसमोर जगण्याचाच प्रश्न
Just Now!
X