थोडक्यावर निभावले

नागपूर : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री पावसाने घेतलेल्या उसंतीनंतर फटाक्याची आतषबाजी झाली. यामुळे ३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र यात कुठलेही मोठे नुकसान झाले नाही. यात एक दुकान तर दोन ठिकाणी कचराघरामुळे शेजारी असलेली झाडे जळाली मात्र, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ आग आटोक्यात आणली. इतवारीमध्ये एका दुकानात फटाका उडाल्यामुळे बाहेर ठेवलेल्या कपडय़ाने पेट घेतला मात्र, नागरिकांनी लगेच पाण्याचा मारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.

टाके मोकळ्या मैदानात उडवण्यात यावे असे आवाहन करण्यात आल्यानंतर शहरातील काही भागात वर्दळीच्या ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. पण रविवारी रात्री ८.३० नंतर पावसाने उसंत घेताच शहरात आतषबाजीला वेग आला. शांतीनगरमध्ये कचराघराला आग लागली. अग्निशमन विभागाने आग विझवली आणि मोठे नुकसान टळले.

रुग्णालय परिसरात किंवा गल्ली बोळामध्ये फटाके उडवू नका, असे आवाहन संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आल्यानंतरही कुणी नियमांचे पालन केले नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० पर्यंत फटाके उडवण्याची मुभा असताना दहानंतर फटाक्यांचे आवाज येत होते.