News Flash

अंबाझरी जैवविविधता उद्यानाला आग

दहा हेक्टरमधील जंगल खाक

(संग्रहित छायाचित्र)

दहा हेक्टरमधील जंगल खाक

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानात मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे दहा हेक्टर जंगल जळून खाक झाले. वनखात्याच्या अग्निशामक पथकाने ब्लोअरच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न के ला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने महापालिके च्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. वनविभाग व पालिके च्या अग्निशामक विभागाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अंबाझरी जैवविविधता उद्यानातील कक्ष क्र . ७९७ मध्ये वासुदेवनगर भागातील वीज मंडळाच्या शंकरनगर टॉवरलाईनमधील एका फिडरवर शॉर्टसर्किट झाल्याने उद्यानातील गवताने पेट घेतला. हे अग्निसंरक्षण कु टीवर कार्यरत हंगामी मजूर संजय अवसरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ अंबाझरी जैवविविधता नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्ष व लगतच्या वसाहतीतील प्रत्यक्षदर्शीनी वनकर्मचारी, वनरक्षक व हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देताच वनखात्याचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका लक्षात घेताच महापालिके च्या अग्निशमन दलाचे पथक बोलावण्यात आले. घटनास्थळावर दलाची तीन वाहने पोहोचली. दरम्यान, वनखात्याच्या अग्निशमन पथकाकडून ब्लोअरच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते. गवत मोठय़ा प्रमाणात असल्याने आगीचा विळखा वाढतच होता. तब्बल दोन तासानंतर सकाळी साडेनऊ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत उद्यानाचा ९.५३२ हेक्टर भागातील गवत जळाले. याबाबत वनखात्याने रितसर गुन्हा नोंदवला. यानंतर प्रादेशिक वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. भविष्यात शॉर्टसर्किटमुळे आगीचा धोका निर्माण होऊ नये म्हणून वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:16 am

Web Title: fire in ambazari biodiversity park nagpur zws 70
Next Stories
1 भ्रमणध्वनी व्यावसायिकांना पन्नास कोटींचा फटका
2 मनमोकळ्या नितीन गडकरींशी ऐसपैस गप्पा
3 तंत्रज्ञाच्या करोना भीतीमुळे यंत्र ठप्प
Just Now!
X