27 October 2020

News Flash

नागपूर-कामठी मार्गावरील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

नागपूर-कामठी मार्गावरील उप्पलवाडी रेल्वे क्रॉसिंगजवळील मोकळ्या मैदानात प्लास्टिकचा हा कारखाना आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागपूर-कामठी मार्गावरील एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी आठच्या सुमारास लागली. अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी धावल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्याप्रमाणात झाली आहे.

नागपूर-कामठी मार्गावरील उप्पलवाडी रेल्वे क्रॉसिंगजवळील मोकळ्या मैदानात प्लास्टिकचा हा कारखाना आहे. सकाळच्या सुमारास अचानक कारखान्याला आग लागली. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूला नागरी वसाहत नसल्याने कोणताही धोका नाही. आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. भीषण आगीमुळे धुराचे प्रचंड लोट उठले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 10:41 am

Web Title: fire in plastic factory on nagpur kamptee road 7 fire tenders on the spot
Next Stories
1 युवराजांचे आगमन आणि प्रभू की लीला
2 मुख्यमंत्र्यांनी तटकरेंबाबत परमेश्वरालाही गोंधळात टाकले
3 विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X