प्रकृती स्थिर, मेयोच्या तज्ज्ञांचे विशेष लक्ष

नागपूर : शहरात आढळलेल्या पहिल्या करोनाग्रस्ताला तापाने ग्रासले आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी त्याला ताप आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

उपराजधानीत सध्या एकू ण चार करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यापैकी अमेरिके हून नागपुरात ५ मार्चला  परतलेल्या पहिल्या रुग्णावर मेयोत तर इतरांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. इतर रुग्णांत पहिल्या रुग्णाची पत्नी, त्याच्यासोबत अमेरिके त प्रवास के लेला सहप्रवासी आणि संपर्कातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पहिल्या करोनाग्रस्ताला मेयोत दाखल के ले तेव्हा त्याला सर्दी, खोकला, ताप, हगवणीसह इतरही काही त्रास होते. उपचारादरम्यान हा त्रास कमी होत गेला. रविवारी त्याला ताप जवळपास नसल्याचे डॉक्टरांनी नोंदवले. परंतु आज सोमवारी त्याला पुन्हा ताप चढला.

मेयोच्या वरिष्ठ डॉक्टरांनुसार, विषाणूजन्य आजारात हा त्रास अधून-मधून होतो.  परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मात्र ताप चढल्यामुळे चिंता व्यक्त के ली जात आहे.   मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय के वलिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न के ला असता त्यांनी रुग्णाला ताप नसल्याचे सांगत काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. सोबतच रुग्णांच्या प्रकृतीची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडूनच घेण्याची सूचना के ली.

मेडिकलमधील रुग्णालाही हलका ताप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या तीन रुग्ण दाखल आहेत. यापैकी एकाला सोमवारी हलका ताप असल्याचे पुढे आले. त्यावर तज्ज्ञांकडून उपचार के ले जात आहेत.  इतर दोन रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावरही तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत.

शासकीय डॉक्टरांच्या धाडसाचे कौतुक

करोना या विषाणूजन्य गंभीर आजाराचे नावही घेतले तर आज सर्वसामान्य नागरिकांसह डॉक्टरांच्याही मनात धडकी भरते. त्यानंतरही कमी संसाधनात मेयो, मेडिकलचे डॉक्टर दिवस-रात्र डोळ्यात तेल लावून  सेवा देत आहेत. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधीक्षक डॉ. कं चन वानखेडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय के वलिया, उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्यासह इतरांकडूनही २४ तास प्रत्येक रुग्णांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या सर्व डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक के ले जात आहे.

शहरातील सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. इतर संशयित व लक्षणे असलेल्यांना सध्या काहीही त्रास नाही. या सगळ्यांवर मेडिकल, मेयोतील तज्ज्ञ डॉक्टर उच्च दर्जाचा उपचार करत आहेत. नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून योग्य काळजी घेतल्यास या आजारावर निश्चितच मात करता येते.

– डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक.