अभ्यासासाठी ‘बीएनएचएस’चे आयोजन

कबूतर हा आपल्या अवतीभवती आढळणारा सर्वसामान्य पक्षी. या पक्ष्याबद्दल अनेकदा लोक बोलतात, पण त्याच्याबद्दलची माहिती आणि संख्या याविषयी सारेच अनभिज्ञ आहेत. कबुतरांची संख्या, त्याचे वर्तन आणि पर्यावरणात त्याचे स्थान या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी)च्यावतीने या आठवडय़ात पहिल्यांदाच कबुतरांच्या गणनेची घोषणा करण्यात आली आहे.

Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Even today Hindus are insecure in the country says Praveen Togadia
‘हिंदूंच्या विकासासाठी हनुमान चालीसा विकास यंत्रणा!’ प्रवीण तोगडिया म्हणाले…
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

पक्षी निरीक्षक, पक्षी वैज्ञानिक, पक्षी संशोधक आणि सर्व निसर्गप्रेमींनी त्यांच्या परिसरातील कबुतरांची पाहणी करावी आणि अहवाल तयार करावा, असे आवाहन बीएनएचएसने केले आहे. कबुतरामधील ‘रॉक पिजन’ हे कबूतर शहरी तसेच ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर दिसतात. त्यांचे मूळ निवासस्थान खडकाळ प्रदेश आणि खडकाळ किनारे असले तरीही उंच इमारतींच्या बांधकामामुळे शहरातही त्यांना निवाऱ्यासाठी भरपूर ठिकाणे उपलब्ध झाली आहेत. अनेकजण कबुतरांचे पालन-पोषण करतात, ज्याला ‘कबूतर खाना’ असे म्हटले जाते. या ठिकाणी त्यांना त्यांचे खाद्य उपलब्ध करून दिले जाते. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. संस्कृतीचा भाग किंवा धर्माचा एक भाग म्हणूनही लोक हे करतात. या कबुतरांची संख्या वेगाने वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. कारण याचा परिणाम थेट लोकांच्या राहणीमानावर होऊ शकतो. कबुतरांमुळे अनेक प्रकारचे आजारही पसरतात असे म्हटले जाते, पण त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी, पर्यावरण आणि त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सामान्य पक्षी निरीक्षण कार्यक्रमांतर्गत कबूतर गणना आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होणारे पक्षी निरीक्षक कबूतर खाना किंवा इतर ठिकाणीही ही गणना करू शकतात. ही संपूर्ण माहिती त्यांनी n.dudhe@bnhs.org वर पाठवावी. कबूतर खान्याचे ठिकाण आणि कबुतरांची गणना संख्या याचादेखील त्यात समावेश असावा. अधिक माहितीसाठी नंदकिशोर दुधे यांच्याशी ७६२०१९३२०७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

कबूतर गणना – रविवार, २८ मे २०१७ पर्यंत आठवडाभरात कधीही.

सहभाग – पक्षी निरीक्षक, अभ्यासक, संशोधक, निसर्गप्रेमी.

गणना कशी? – कबूतर खाना किंवा जिथे कबूतर आढळतात.

अहवाल – गणनेच्या ठिकाणाची माहिती, छायाचित्रांचा समावेश आवश्यक.