News Flash

रेमडेसिविरच्या काळाबाजारप्रकरणी डॉक्टरसह पाच जण जेरबंद

या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अ‍ॅसिडीटीचे इंजेक्शन लावून रेमडेसिविरची चोरी

 

नागपूर : अतिदक्षता विभागातील रुग्णाला रेमडेसिविर ऐवजी अ‍ॅसिडीटीचे इंजेक्शन देऊन दोन इंजेक्शन चोरी केल्यानंतर त्याची काळाबाजारी करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका महिला डॉक्टरला अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या २० एप्रिलला पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ च्या पथकाने कारवाई करून न्यूरॉन रुग्णालयाचा परिचारक शुभम संजय पानतावणे (वय २४, रा. सेवाग्राम), मनमोहन नरेश मदने (वय २१) आणि प्रण दिनकरराव येरपुडे (वय २१) दोन्ही रा. महाल यांना मेडिट्रिना रुग्णालयाच्या परिसरातून दोन रेमडेसिविरसह रंगेहात पकडले होते. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता शुभम हा दिनेश गायकवाड नावाच्या मित्रासह एकाच खोलीत राहायचा. दिनेश हा डोंगरगाव परिसरातील कोविडालयात परिचारक असून त्याने रुग्णालयातील आयसीयुत दाखल एका रुग्णासाठी देण्यात आलेले रेमडेसिविर चोरले व  त्याऐवजी त्याने रुग्णाला अ‍ॅसिडीटीचे इंजेक्शन लावले. रुग्णाच्या जीवाशी खेळून त्याने ते इंजेक्शन काळाबाजार करण्यासाठी स्वत:च्या खोलीत ठेवले होते. दरम्यान खोलीत दोन रेमडेसिविर असल्याचे कळताच शुभमने ते चोरले व त्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात डॉक्टर असलेल्या देवयानी पडोले हिला अधिकच्या भावात विकण्याचे ठरवले. तिने शुभमशी रेमडेसिविरसाठी संपर्क केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी देवयानी व दिनेश यांनाही अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दोन पोलीस  कर्मचाऱ्यांना करोना या प्रकरणाचा तपास करताना एका आरोपीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासातील कर्मचाऱ्यांनी स्वत:ची चाचणी करून घेतली असून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:03 am

Web Title: five people including doctor arrested black market of remedesivir injection akp 94
Next Stories
1 पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ३० जणांना अटक
2 उत्परिवर्तित विषाणूमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक
3 आदिवासी भागात प्राणवायू ‘कॉन्सनट्रेटर’ संजीवनी ठरतोय
Just Now!
X