17 January 2021

News Flash

फुलांची बाजारपेठ महागली

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ही फुले १० ते २० टक्क्यांनी महाग झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आवक कमी आणि मागणी जास्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये होत असलेल्या दरवाढीचा परिणाम फुलांवर झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील सीताबर्डी भागातील फूलांच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाची फुले भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेशोत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात फुलांची मागणी असते मात्र ही आवक कमी प्रमाणात झाल्याने फुलांचा बाजार तेजीत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ही फुले १० ते २० टक्क्यांनी महाग झाली आहे.

गणेशोत्सव, महालक्ष्मी आणि मोहरम असे तीन उत्सव लागून असल्यामुळे बर्डीवरील नेताजी मार्केटमध्ये फुलांच्या बाजारात फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. अन्य वेळी ६० ते ७५ रुपये किलो असलेली झेंडूची फुले ८० ते १२० रुपये आणि शेवंती १५० ते २००  रुपये किलो या प्रमाणे विकली जात आहेत.

नेताजी बाजारात राज्यातील नाशिक, पुणे, हिंगोली या राज्यातील शहरासह आंध्रप्रदेश आणि कोलकाता येथून फुलांची आवक होते. मात्र गेल्या काही दिवसात राज्यातील आवक कमी झाली आणि मागणी मात्र वाढली आहे. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब, फोरालिया, मोगरा , पिटोनिया, जास्वंद, चाफा, मोगरा, गौरी चाफा यांना मागणी आहे. साधा गुलाब ८० ते १०० रुपये तर डच गुलाब १५० रुपये किलो आहे. गुलाबाच्या २० फुलांसाठी २५० रुपये मोजावे लागत आहेत.  लिली ६०, रजनीगंधा ४०० रुपये प्रति किलो आहे. जाईच्या फुलांचे भाव ६०० रुपये, ६० रुपये किलो जरबेरा, ७० ते ८० रुपये किलो पिवळा झेंडू, १५० रुपये किलोप्रमाणे अस्तर ही शोभिवंत फुले बाजारात विक्रीला आहे.

पावसाअभावी विदर्भात स्थानिक ठिकाणाहून फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाहेरून वेगवेगळी फुले बाजारात येऊ लागली आहे. पेट्रोल डिझेलची भाववाढ, वाहतूक खर्च यामुळे भाव दुपटीने वाढले असल्याचे नेताजी बाजार येथील फूल विक्रेते रामचंद पिल्लारे यांनी सांगितले. गणपती उत्सवात झेंडू, गुलाब, शेवंती आणि काही शोभिवंत फुलांची मागणी वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात आवक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 3:46 am

Web Title: flowering market is very expensive
Next Stories
1 मेट्रोची ‘ट्रायल रन’ ताशी ९० किमी वेगाने
2 विदर्भात यंदाही कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा
3 अप्रशिक्षित व्यायाम शिक्षकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात!
Just Now!
X