विविध भागांतील ७० पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांच्या खामला भागातील  निवासस्थानातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. शहरातील विविध भागातील ७० पेक्षा अधिक बेकायदा बांधकामे तोडण्यात आली. मोमीनपुरा भागात ँपदपथावर थाटलेल्या दुकानांवर कारवाई करताना  काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

राजेंद्र मुळक यांच्या खामल्यातील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे त्यांना लक्ष्मीनगर झोनकडून नोटीस दिली होती. त्यानुसार अतिक्रमण पथक पोहोचले. मात्र त्यापूर्वीच मुळक यांनी स्वत:च जेसीबी बोलावून इमारतीचा समोरचा अनधिकृत भाग उतरवला.

मोमीनपुरा भागातील पदपथावर मोठय़ा प्रमाणात छोटय़ा विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. दोन आठवडय़ापूर्वी त्या ठिकाणी कारवाई केली होती. पुन्हा विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने अतिक्रमण पथक कारवाईसाठी पोहोचले. मात्र, कारवाईला विरोध करण्यात आला. लोकांनी बुलडोझर आणि जेसीबी परिसरात येऊ दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले व बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी २६ दुकानांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय शहरात  मंगळवारी झोनअंतर्गत वसंत चौक येथील एका इमारतीतील अनधिकृत बाल्कनी तोडण्यात आली. शेजारी असलेले दोन ओटे तोडण्यात आले. दयानंतर पार्क परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. अनेकांनी त्या ठिकाणी दुकाने थाटली होती.

महापालिकेचे पथक

पोहोचल्यावर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. आझमशहा चौक ते दारोडकर चौक , गांधी गेट टांगा स्टॅन्ड चौक, शहीद चौक ते तीन नल चौक आणि गांजाखेत ते मोनीनपुरा या भागातील अनधिकृत बांधकाम व फुटपाथवरील अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.