अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी आपल्या विधान परिषद सदस्य मुलाची शिवसेनेत ताकद वाढण्यासाठी शहर काँग्रेसला भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शहर काँग्रेसचे सरचिटणीस अंगद हिरोंदे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

आज डिप्टी सिग्नल निवासी शहर अंगद हिरौंदे यांना शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेचा झेंडा हिरोंदे यांना देऊन स्वागत केले.

अंगद छत्तीसगढी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष व अखिल भारतीय तेली महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत. पूर्व नागपूर शिवसेनेचा गड आहे. आगामी महापालिका निवडणुकीत छत्तीसगडी समाज सोबत राहणार असल्याने चित्र बदलेले असेल.

अंगदच्या प्रवेशाने पूर्व नागपुरात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचा दुष्यत चतुर्वेदी यांनी केला आहे. यावेळी अंगद सोबत गोपाल वाघ, आल्हा खरे, जगदीश पटोडी, मनोज शाहू, मुकेश यादव, रवि शाहू, जोहन शाहू, विनोद उइके, पिंटू शाहू, बसंत वर्मा, किशोर कुरवे, शैलेश माहेश्वरी, राकेश हिरवानी, प्रकाश बर्मन, जीतू महिलांगे, कैलाश बर्मन, आत्मा बाडाबाग, आत्मा हिरवानी, सुखचंद यादव, हेमंत ब्रम्हे, अजय सबरसांठी, शेख महफूज, दीना शाहू, तुलसी शाहू, रवि वाघमारे, भारत सरवा, हेमरू शाहू, राजूभाई  जुम्मन, श्रीकांत रेकुलवार, चैतराम शाहू, अनिल गायागवाल, नीलेश बघेल, आकाश बंजारे, संतोष शाहू आदींनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

चतुर्वेदी यांची खेळी

सतीश चतुर्वेदी यांची एकेकाळी नागपूरच्या राजकारणावर पकड होती. दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपुरात त्यांचे शेकडो समर्थक होते. अजूनही काही प्रमाणात आहेत. हीच संधी साधून पुत्र शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ त्यांना उभे करण्याची खेळी सुरू केली आहे.