23 January 2020

News Flash

साडेचार वर्षांत वीजदरात ३० ते ९४ टक्के वाढ

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत महावितरणने सहा वेळा वीज दर वाढवले

प्रतिनिधिक छायाचित्र

महेश बोकडे

जून २०१५ पासून सहा वेळा दरवाढ

राज्यात गेल्या साडेचार वर्षांत महावितरणने सहा वेळा वीज दर वाढवले. ही दरवाढ २९ ते ९४ टक्के असून आधीच महागाईने त्रस्त जनतेच्या खिशावर या दरवाढीने मोठा ताण पडला आहे. या काळात विजेचा स्थिर आकारही १०५ ते १४६ टक्क्यांनी वाढला आहे.

महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाच्या परवानगीने १ जून २०१५ मध्ये सुमारे ९ ते १० टक्के, १ नोव्हेंबर २०१६ मध्ये सुमारे १० टक्के, १ एप्रिल २०१७ मध्ये ०.४ ते १ टक्के, १ एप्रिल २०१८ मध्ये ०.२ ते ०.९५ टक्के, १ सप्टेंबर २०१८ मध्ये ६ ते १३ टक्के, १ एप्रिल २०१९ मध्ये ७ ते ८ टक्के दर वाढवले आहेत. प्रत्येक वर्षीची दरवाढ वर्षनिहाय कमी दिसते, परंतु पहिल्या वर्षीपासून आजच्या वीजदराशी तुलना केल्यास ही दरवाढ घरगुती सिंगल फेज, घरगुती थ्री फेज, वाणिज्यिक या तिन्ही गटांमध्ये ३० ते ९४ टक्यांपर्यंत वाढली आहे. त्यातच २०१४ मध्ये घरगुती सिंगल फेज मीटरच्या ग्राहकांना स्थिर आकार महिन्याला ४० रुपये, घरगुती थ्री फेज मीटरला १३० रु. आणि वाणिज्यिक मीटरला १९० रुपये लागत होते. तेही गेल्या साडेचार वर्षांत चार वेळा वाढून १०५ ते १४६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. सध्या स्थिर आकार हा अनुक्रमे ९० रुपये, ३२० रुपये आणि ३९१ रुपये असा आहे.

भार वाढला, पण दर्जाही सुधारला

‘‘दरवाढ थोडी जास्त असली तरी महावितरणने राज्यभरात वीज यंत्रणा सक्षमीकरण, नवीन उपकेंद्र उभारण्यासह इतरही अनेक नवीन कामे केली आहेत. दरम्यान, उन्हाळ्यात बऱ्याचदा ग्राहकांना अखंडित वीजपुरवठय़ासाठी बाह्य़स्रोतांकडूनही महागडी वीज खरेदी करावी लागते. गेल्या काही वर्षांत ग्राहकांवर वीज दरवाढीचा भार वाढला, परंतु सेवेचा दर्जाही सुधारला आहे.

— पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

‘‘२०१४ या वर्षीच्या तुलनेत महावितरणच्या आजच्या वीज दरांची तुलना केल्यास ३० ते ९४ टक्के दरवाढ झाली आहे. स्थिर आकाराचे दरही १०५ ते १४६ टक्क्के वाढले आहेत. आधीच्या तुलनेत आजच्या दराशी तुलना केल्यास ही दरवाढ खूप जास्त असली तरी प्रत्येक वर्षांतील वाढ बघितली तर कमी आहे.

– महेंद्र जिचकार, वीज क्षेत्राचे जाणकार.

First Published on April 10, 2019 1:37 am

Web Title: four and a half years power tariffs increased by 30 to 94 percent
Next Stories
1 शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे रात्रीच्या अंधारात बिनकामाचे
2 उष्मा कमी करणाऱ्या ‘ग्रीन नेट’चा बाजार तेजीत
3 खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण मेडिकलमध्ये निगेटिव्ह!
Just Now!
X