News Flash

बस-पिकअप व्हॅनच्या धडकेत चार ठार

अपघातात चार जण ठार तर १३ जण जखमी झाले.

प्रातिनिधिक छायाचित्र

१३ प्रवासी जखमी

गडचिरोली : आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्लीजवळ चंदनखेडी फाट्यावर शिवशाही बस आणि पीकअप व्हॅन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात चार जण ठार तर १३ जण जखमी झाले. ही घटना रविवारी ऐन होळीच्या दिवशी घडली. सकाळी घडली. मृतांमध्ये चालक साई रमेशबाबू सूर्यदेवरा यांच्यासह दोन महिला व एका मजुराचा समावेश आहे. जखमींना चंद्रपूर व गडचिरोली येथे हलवले आहे.

तेलंगणातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना ब्रम्हपुरी येथे घेऊन जाणारी पिकअप वाहन (क्र. टी एस ०४ यूडी ५८४०) आणि प्रवाशांना घेऊन भंडारा येथून अहेरीकडे येणाऱ्या शिवशाही बस (क्र. एम एच ४० वाय ५६०१) या दोन वाहनांमध्ये चौडमपल्ली जवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर धडक झाली. यात पीकअप वाहनाच्या चालकासह एक मजूर जागीच ठार झाला. पिकअप वाहनात एकूण १७ मजूर होते. त्यापैकी दोघे जागीच ठार तर १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला नेण्यात आले असून उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचार घेत असल्याचे कळते. दरम्यान, गडचिरोली येथे उपचारार्थ नेण्यात येत असलेल्या दोन महिला मजुरांसह एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:55 am

Web Title: four killed in bus pickup van crash akp 94
Next Stories
1 विदर्भात  तापमान वाढले
2 आयएफएस महिला असोसिएशनचे ‘पीसीसीएफ’ला पत्र
3 घराजवळील विलगीकरण केंद्रामुळे करोनावर नियंत्रण शक्य
Just Now!
X