News Flash

मित्रानेच केला मित्राचा खून

नरेश लक्ष्मण बाहेकर (२६) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शेमुळे त्याला उठणे कठीण झाले व नरेशने एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर दोन तीन वार केले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

चार-पाच थापड मारण्याचा वचपा

चार-पाच थापड मारल्यामुळे द्वेषातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किरण सदाशिव मेश्राम (२२), रा. भुजबळ लेआऊट असे मृताचे नाव आहे.

नरेश लक्ष्मण बाहेकर (२६) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. किरण ट्रकचा वाहक म्हणून काम करायचा, तर आरोपी हा मजुरीचे काम करतो. दोघेही चांगले मित्र होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ते भेटले. यावेळी मौजमस्ती करण्यात किरणने लक्ष्मणला चार-पाच थापड मारल्या. त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले. मात्र, नरेश हा किरणवर प्रचंड चिडला होता. त्याने रात्री ९ वाजताच्या सुमारास घरातील मासोळी कापण्याची पावशी घेतली व त्रिमूर्तीनगरातील गजानन मंदिर परिसरातील मैदानात लपवून ठेवली. त्यानंतर तो किरणच्या घरी गेला व दारू पिण्यासाठी सोबत चलायची विनंती केली. त्यानंतर नरेशने दारूची बाटली घेतली व गजानन मंदिर परिसरातील मैदानावर दारू पित बसले. नरेशने किरणला खूप दारू पाजली व स्वत:ची दारू मातीमध्ये फेकत गेला. किरण दारूच्या नशेत झिंगल्यानंतर नरेशने मातीवरच झोपण्याचे नाटक केले. त्याच्याप्रमाणे किरणही मातीवरच झोपला. याचा फायदा घेत त्याने लपवून ठेवलेली पावशी काढली व किरणच्या डोक्यावर वार केले. किरणने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेमुळे त्याला उठणे कठीण झाले व नरेशने एक दगड घेऊन त्याच्या डोक्यावर दोन तीन वार केले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आत्मसमर्पण केले

मित्राच्या खून केल्यानंतर नरेशने पावशी शेजारच्या झुडुपात फेकली व रात्री १२ वाजताच्या सुमारास घरी गेला. कपडे बदलले व आंघोळ केली. मात्र, मित्राचा खून केल्याचा विचार त्याला सतावत असल्याने रात्री २ वाजताच्या सुमारास तो प्रतापनगर पोलीस ठाण्यात गेला व सर्व हकीकत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. नरेशला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 3:26 am

Web Title: friend murdered by friend in nagpur
Next Stories
1 आ. तानाजी सावंत यांचे भाजपच्या गडाला शह देण्याचे संकेत
2 आदिवासींच्या विकासात नक्षलवाद्यांचा खोडा
3 पक्षाची संघटनात्मक बांधणी भाजपकडून शिका
Just Now!
X