महिलांमध्ये पोलिसांविरोधात रोष

कपडे बदलण्याच्या खोलीत कॅमेरा लावून अश्लील चित्रफित तयार करण्याच्या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी कापड दुकान फ्रेन्ड्सचे मालक किसन इंदरचंद अग्रवाल (५४) रा. राधाकृष्ण मंदिर, वर्धमाननगर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल न करताच सोडून दिले. पोलिसांच्या या कृत्यामुळे महिला सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून मालकावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गेल्या शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनी सीताबर्डीतील फ्रेन्ड्स कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना कपडे बदलण्याच्या खोलीत मोबाईल कॅमेरा एका निळ्या रंगाच्या कापडाच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे दिसले होते. या मोबाईलद्वारे तरुणींचे तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे काय?

फ्रेन्ड्सच्या मालकाचे अनेक शिक्षण संस्थांसोबत लागेबांधे आहेत. त्यामुळे अनेक शाळांचे गणवेश त्या दुकानातून खरेदी करावे लागतात. विद्यार्थिनीही दुकानात जाऊन मोठय़ा प्रमाणात कपडे खरेदी करतात. त्यामुळे कपडे बदलण्याच्या खोलीतून अश्लील चित्रफित तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असेल. यातून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. अशा चित्रफितींमधून दुकानाचे मालक व संबंधित रग्गड पैसा कमावत तर नाही, किंवा अश्लील चित्रफित निर्मितीच्या दुनियेशी त्यांचे काही संबंध तर नाही, याचा तपासही होण्याची आवश्यकता आहे.

“अनेक वर्षांपूर्वी मी याच दुकानात कपडे खरेदी करायला गेली होती. त्यावेळी माझ्य़ासोबत कुसुम घिया या होत्या. कपडे बदलायला खोलीत गेले असताना दुकानाच्या काऊंटरवर संगणकात दोघेजण अतिशय गांभीर्याने बघत होते. त्यावेळी कुसुम घिया यांना संशय आला. त्यांनी मला आवाज देऊन कपडे बदलण्यापासून रोखले. आम्ही कपडे तसेच सोडले व निघून गेलो. तेव्हा आम्हाला हा प्रकार सिद्ध करता येऊ शकत नव्हता. पण, या तरुणीने हिंमत करून प्रकरण उजेडात आणले. ही विकृत मानसिकता असून अशा आंबटशौकीन दुकानाच्या मालकासह सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच आरोपींना वाचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी.    -“ रेखा दंडिगे-घिये, सामाजिक कार्यकर्त्यां.”

“या घटनेनंतर मॉलमधील कर्मचाऱ्यांचीही पडताळणी आवश्यक असून पोलिसांनी शहरातील सर्व मॉल व कापड विक्रीच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. सीताबर्डी व अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मॉल व दुकानांची पाहणी करण्यात आली. यावेळी कुठल्याही कपडे बदलण्याच्या खोलीत कॅमेरे असल्याचे आढळले नाही. पण, अनेकांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची पडताळणी केली नसल्याची बाब समोर आली आहे. फ्रेन्ड्सप्रकरणी पोलिसांकडून काही गैरव्यवहार करण्यात आला असल्यास चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.         -“ विनीता शाहू, पोलीस उपायुक्त.”