करोनाने देशच नव्हे जगभरातील र्सवकष चित्र बदलून टाकले आहे. वर्तमान जसे अस्वस्थ आहे, तशीच भविष्याची चिंताही गंभीर आहे. परंतु या विदारकतेतही काही सकारात्मक गोष्टी खुणावत आहेत. त्या सकारात्मक गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, त्यातून करोनानंतरच्या जीवनाचा नवा प्रारंभ कसा घडवून आणता येईल या आणि अशा अनेक पैलूंवर केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी प्रकाश टाकणार आहेत. शुक्रवार, १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या उपक्रमात वेबिनारच्या माध्यमातून गडकरी वर्तमान स्थितीवर संवादात्मक भाष्य करणार आहेत. सुसंवादक सुधीर गाडगीळ त्यांच्याशी ऐसपैस गप्पा रंगवतील.

सहभागी कसे व्हाल?

http://tiny.cc/Loksatta_SahajBoltaBolta या लिंकवर जाऊन नोंदणी करा. नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून आपल्या ईमेल आयडीवर संदेश येईल. त्याद्वारे शुक्रवार १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता या संवादात आपल्याला सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.