केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांच्या राजकारणातील रोखठोक भूमिकांचे नेहमीच कौतुक होते. क्रिकेटवरचे जीवापाड प्रेम असो वा पट्टीची खवय्येगिरी. त्यांच्या प्रत्येक कृतीची ‘बातमी’ होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता आपसूकच वाढते. त्यांचे चौफेर अनुभव आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू जाणून घेण्याची संधी वाचकांना शुक्रवार, १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या उपक्रमात मिळणार आहे. या वेबिनारमध्ये सुसंवादक सुधीर गाडगीळ त्यांच्याशी गप्पा रंगवतील.

सहभागी कसे व्हाल?

http://tiny.cc/Loksatta_SahajBoltaBolta या लिंकवर जाऊन नोंदणी करा. नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून आपल्या ईमेल आयडीवर संदेश येईल. त्याद्वारे शुक्रवार १५ मे रोजी सायंकाळी

७ वाजता या संवादात आपल्याला सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.