गंगाबाई घाटावर पाण्यासह इतरही सुविधांचा अभाव; ‘विसावा’ मोकाट जनावरांचे आश्रयस्थान; प्रतीक्षालयातील बाके तुटलेली

अंतिम संस्कारासाठी घाटावर येणाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी प्रत्यक्षात घाट हे लुटीचे केंद्र ठरू लागले आहे. पूर्व नागपुरातील गंगाबाई घाटावर अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकूड खरेदीपासून तर तेथे मुंडणापर्यंत आणि इतरही कामांसाठी अक्षरश: लूट केली जाते.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

नागपूर महापालिकेतर्फे घाटावर गोवऱ्या आणि लाकूड नि:शुल्क देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. एका मृतदेहासाठी १० किलो गोवऱ्या आणि ३०० किलो लाकूड देणे अनिवार्य आहे, परंतु या प्रमाणात ते कधीच उपलब्ध केले जात नाही. लोकंही तक्रार करीत नाही, कमी पडल्यास अतिरिक्त पैसे देऊन लाकूड खरेदी करतात. आगारापासून दहन ओटय़ापर्यंत लाकडे पोहोचवण्याचे काम खरे तर महापालिका कर्मचाऱ्यांचे आहे, पण तसे होत नाही. लाकूड वाहण्यासाठी असलेली गाडी नादुरुस्त आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागतात. चितेला भडाग्नी देणाऱ्याचे मुंडण केले जाते. त्यासाठी येथे ४०० ते ५०० रुपये आकारले जाते. एरव्ही ५० रुपयांत हे काम होते.

या घाटावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणपणे दोन तास लागतात. तोपर्यंत तेथे बसण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय उपलब्ध होणे आवश्यक आहे. प्रतीक्षालयातील निम्मी बाके तुटलेली आहेत. येथे येणाऱ्यांना मिळेल त्या जागी बसावे लागते किंवा एक-दीड तास उभे राहावे लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गैरसोय होते. शिवाजीनगर, भूतेश्वरनगर परिसरातील दुकानात जाऊन पाणी विकत आणावे लागत आहे.

घाटावर २५ दहन ओटे आहेत. त्याची लांबी आणि रुंदी कमी असल्याने सरण रचल्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा     घालताना अडचणी येतात. भडाग्नी दिल्यानंतर मृत्यदेहाला प्रदक्षिणा झाल्याची व त्यानंतर हातपाय धुण्याची पद्धत आहे, परंतु या घाटावर लाकूड भंडाराजवळ खड्डा खोदून त्यात नळ बसवण्यात आल्याने ते पाणी वापरणे गैरसोयीचे ठरते. अंत्ययात्रा घाटात प्रवेश करण्यापूर्वी मृतदेह विसाव्यावर ठेवण्यात येतो. घाटावरील विसावा ओटा गायी, कुत्री, डुकरे यांचे आश्रयस्थान झाले आहे. या घाटचे १५ वर्षांपूर्वी सौंदर्यीकरण झाले. त्यानंतर तेथील देखभाल दुरुस्तीसाठी एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले. आता परत महापालिकेचे घाट व्यवस्थापन आहे.

सौंदर्यीकरण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती नीट होत नसल्याने घाटावरील हिरवळ गायब झाली आहे. हे दहनघाट रात्री समाजकंटकांचा अड्डा झालेला असतो. असामाजिक तत्त्वे येथे दारू पितात, पत्ते खेळतात तसेच रात्री गुन्हे करून लपण्यासाठी घाटाचा वापर होतो, परंतु याबाबत कुणीही तक्रार करत नाही.

डिझेल शवदाहिनीला अल्प प्रतिसाद

मृतदेह जाळण्यासाठी लाकडाचा कमीत कमी वापर करून पर्यावरण सरक्षणासाठी अनेक स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत आहेत. गंगाबाई घाटावर एक डिझेल शवदाहिनी आहे, परंतु या शवदाहिनीचा अत्यल्प वापर होत आहे. गेल्या महिन्यात सुमारे अडीचशे मृतदेह येथे जाळण्यात आले. त्यातील केवळ १५ मृतदेहासाठी डिझेल शवदाहिनीचा वापर झाला.

शोकसभागृहाला कुलूप

अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण झाल्यावर शोकसभा घेतली जाते. त्यासाठी या घाटावर सभागृह बांधण्यात आले आहे. मात्र, त्याला कायम कुलूप असते. त्यामुळे सभागृहाबाहेरील मोकळ्या जागेत शोकसभा होते.

वाहनतळाची व्यवस्था नाही

दररोज घाटावर दहा ते बारा अंत्यसंस्कार होतात. अंत्ययात्रेत सहभागी होणारे त्यांच्या वाहनाने येतात. त्यासाठी वाहनतळाची सुविधा नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. दुचाकी वाहनांमुळे अनेकदा घाटाच्या प्रवेशद्वारापुढे कोंडी होते. त्याचवेळी आणखी एखादी शवयात्रा आली तर तिला आत प्रवेश करताना अडचणी येतात.