क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात आईने रागावल्याने एका तरुणीने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत बोखारा परिसरात रविवारी घडली.
राखी सुरेश आवळे (२७) रा. बोखारा असे मृत तरुणीचे नाव आहे. राखीचे आईवडील मजुरीचे काम करतात. तिला एक भाऊ असून तोही मिळेल ते काम करतो. राखीने काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. पण, त्यांच्यात मतभेद झाले व दोघांनी घटस्फोट घेतला. तीन वर्षांपूर्वी ती आईवडिलांसोबत राहते. ती खासगी काम करायची. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तिचा आपल्या आईसोबत वाद झाला. त्या वादानंतर तिची आई शेजाऱ्यांकडे गेली. या दरम्यान तिने घरच्या दुचाकीतील पेट्रोल काढले व स्वत:च्या अंगावर ओतून जाळून घेतले. ती संपूर्णपणे भाजली गेली. धूर निघाल्यानंतर शेजाऱ्यांनी तिच्या आईवडिलांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब आग विझवून राखीला मेयो रुग्णालयात दाखल केले. पण, शंभर टक्के जळाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 3:20 am