News Flash

आजीसमोर नातीवर बलात्कार

पीडित १९ वर्षीय तरुणी मध्यप्रदेश शिवनी येथील रहिवासी आहे.

प्रातिनिधिक

एका व्यक्तीने आजीसमोर नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. यावेळी आजीने संबंधित व्यक्तीला कोणताही विरोध न केल्याने आजीने फूस लावल्यामुळेच हा प्रकार घडला, असा आरोप नातीने केला आहे. याप्रकरणी आजीसह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेख इस्राईल शेख हुसेन (४५, रा. गौसीया कॉलनी) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा टाईल्सचा व्यवसाय आहे. पीडित १९ वर्षीय तरुणी मध्यप्रदेश शिवनी येथील रहिवासी आहे. तिच्या आजोबाची बहीण गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाते. ती एका झोपडीत राहात असल्याने तिच्या घराचे काम करायचे होते. त्याकरिता फेब्रुवारीला नागपुरात आली होती. त्यादरम्यान ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता पीडित तरुणी व आजी घरी असताना आरोपी तेथे आला. तो आजीच्या परिचयाचा होता. आजीच्या सांगण्यावरून तो तिच्यावर बळजबरी करू लागला. तिने विरोध केला असता आजीने मदत न करता उलट आरोपीची साथ दिली. तो बलात्कार करून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडिता गावी गेली व कुटुंबीयांना हकिगत सांगितली. याप्रकरणी शिवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण गिट्टीखदान पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:27 am

Web Title: girl rape in front of grandmother in nagpur zws 70
Next Stories
1 व्हॉट्सअ‍ॅप, गुगलवरून परीक्षेची उत्तरे लिहिणाऱ्याला पकडले
2 आमदार तुपाशी अन् निवृत्ती वेतनधारक उपाशी!
3 एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
Just Now!
X