19 January 2020

News Flash

बलात्कारानंतर बालिकेची दगडाने ठेचून हत्या

नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील घटना

(संग्रहित छायाचित्र)

 

हैदराबाद, उन्नाव प्रकरणे ताजी असतानाच क्रौर्याचा कळस गाठणारे आणखी एक प्रकरण नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर तालुक्यात घडले. पाच वर्षांच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

कळमेश्वरमधील एका गावात पीडित बालिका आईवडिलांसह राहत होती. ती शुक्रवारी जवळच राहणाऱ्या आजीकडे गेली होती. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर शनिवारी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. कुटुंबीयांसह गावकरी शोध घेत असतानाच रविवारी सकाळी तिचा मृतदेह घरापासून सुमारे दोन किलोमीटरवरील एका शेतात आढळला. पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी वेगवेगळ्या भागांतून तीन संशयितांना ताब्यात घेतले. मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे नागपूरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

टी- शर्ट तोंडात कोंबले

पीडित बालिकेला तुरीच्या शेंगा आवडत होत्या. त्यामुळे आरोपीने तिला आमिष दाखवून तुरीच्या शेतात नेले. मुलीचा आवाज दाबण्यासाठी तिचेच टी- शर्ट तिच्या तोंडात कोंबले. या अवस्थेत मृतदेह पाहून गावकरीही हादरले.

First Published on December 9, 2019 12:49 am

Web Title: girl stabbed to death after rape abn 97
Next Stories
1 विद्यार्थी संख्येवरून वेतन ठरवण्याविरोधात शिक्षक आक्रमक
2 नागपुरात पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड
3 नागपूर : बिहाडा खाणीत पडून वाघाचा मृत्यू
Just Now!
X