नागपूर : लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून ही बाब पुढे आली.
रश्मी विजय दुरणे (३९) रा. श्री शिव अपार्टमेंट, मनीषनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिला दोन लहान भाऊ आहेत. रश्मीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीय वर बघण्याचा प्रयत्न करत होते. तिचे वय चाळीशीपर्यंत गेले होते. त्यामुळे ती नैराश्यात होती. तिचे लग्न होत नसल्यामुळे तिच्या दोन्ही लहान भावांचे लग्न होत नव्हते. बुधवारी नातेवाईकांकडे लग्न समारंभ असल्यामुळे घरचे सर्व लग्नात गेले होते. रश्?मीने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई घरी आल्यानंतर रश्मी गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, रश्मीने मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. पत्रात तिने लग्न जुळत नसल्याने कुटुंबीयांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वाची माफी मागितली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 19, 2019 5:42 am