News Flash

कोविशिल्ड मिळाली, कोव्हॅक्सिन कधी?

कोव्हॅक्सिनच्या लसी कमी असल्याने त्याचा पुरवठा कधी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांची स्थिती

नागपूर : केंद्र सरकारकडून एकीकडे लसीकरणावर भर देण्याच्या सूचना विविध राज्यांना केल्या जातात, तर दुसरीकडे अद्यापही मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. नागपूरच्या काही खासगी केंद्रात कोविशिल्डच्या लसी संपल्याने २१ एप्रिलला लसीकरण झाले नाही. परंतु नागपूर विभागात गुरुवारी ८५,५०० लसींच्या मात्रेचा पुरवठा झाल्याने दिलासा मिळाला. परंतु आता कोव्हॅक्सिनच्या लसी कमी असल्याने त्याचा पुरवठा कधी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिन नसल्याने बऱ्याच केंद्रांवर नागरिकांना पहिली मात्रा दिली जात नाही, हे विशेष. नागपूर विभागात २१ एप्रिलच्या रात्री कोविशिल्डच्या १ लाख ५७ हजार २३० मात्रा, कोव्हॅक्सिनच्या ४१ हजार ६४७ मात्रा उपलब्ध  होत्या. उपलब्ध साठ्यात कोविशिल्डच्या भंडाऱ्यातील १८ हजार ५४०, चंद्रपूरच्या ५००, गडचिरोलीतील ३ हजार ३००, गोंदियातील २ हजार १३०, नागपूर महापालिका हद्दीतील ७ हजार १६०, नागपूर ग्रामीणच्या ४३ हजार ५८०, वर्धा जिल्ह्यातील १४ हजार ५२० मात्रांचा समावेश होता. तर कोव्हॅक्सिनच्या भंडारा जिल्ह्यात ३७ हजार ५७०, चंद्रपूरला १ हजार ४००, गडचिरोलीत ३ हजार ८९०, गोंदियात १७ हजार ३५०, नागपूर महापालिका हद्दीत ३ हजार ८९०, नागपूर ग्रामीणला ११ हजार ७९०, वर्धा जिल्ह्यात ३ हजार ९७० मात्रा उपलब्ध होत्या. त्यातच गुरूवारी सकाळच्या सत्रात नागपूरच्या बऱ्याच केंद्रात कोविशिल्डच्या लसींचा साठा संपल्याने लसीकरण झाले नाही.  कोविशिल्डचा नागपूर विभागासाठी ८५ हजार ५०० मात्रेचा साठा पोहोचल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. त्यामुळे पुन्हा दुपारनंतर काही ठिकाणी लसीकरण सुरू झाले.

ही लस पोहचली असली तरी कोव्हॅक्सिनचा साठा आता कमी आहे. त्यामुळे नागपूरसह इतरही भागातील बऱ्याच केंद्रावर आता दुसरी मात्रा घेण्यासाठी येणाऱ्यांनाच लस दिली जात आहे. तर पहिली मात्रा देणाऱ्यांना नवीन साठा आल्यावर लसीकरणासाठी येण्याची विनंती विविध केंद्रावरून होताना दिसत आहे.

५८९९ रेमडेसिविर मिळाले

रेमडेसिविर इंजेक्शनच्या गुरुवारी ५८९९ कुप्प्या प्राप्त झाल्या. नागपूरला ७५०० इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आश्वासन रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांकडून न्यायालयात देण्यात आले होते. त्यातुलनेत आज प्राप्त रेमडेसिविरची संख्या कमी असली तरी अलीकडच्या दोन-तीन दिवसांतील ही संख्या सर्वाधिक आहे. आज प्राप्त झालेल्या साठ्याचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील १३८ आणि ग्रामीण मधील १३८ कोविड रुग्णालयांना करण्यात आले. यात खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. नॅशनल कॅन्सर इस्पितळाला ७३, गायकवाड कोविड रुग्णालयाला १६, खापरीतील विवेकानंद दवाखान्याला २५ तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला १२१० इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:38 am

Web Title: got covshield covacin ever vaccine akp 94
Next Stories
1 व्यासंगी आणि अभ्यासू समीक्षक काळाच्या पडद्याआड
2 रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न
3 आयुर्वेदिक रुग्णालयात कोविड सेंटरचे घोडे अडले!
Just Now!
X