‘एनएचएसआरसीएल’ने निविदा मागवली

नागपूर : मुंबई-नाशिक-नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन (अतिजलद) चालवण्यासंदर्भात प्राथमिक पाहणी अहवाल तयार करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) आज मंगळवारी निविदा मागवली आहे.

महाराष्ट्रातील नाशिक मार्गे धावणारी मुंबई ते नागपूर या ७४१ किलोमीटर अंतरावर बुलेट ट्रेन चालवण्यासाठी सव्‍‌र्हे करण्यासाठी ही निविदा आहे. या सव्‍‌र्हेमध्ये भुयारी रेल्वे, जमिनीवरील रेल्वेमार्ग आणि जमिनीपासून उंच रेल्वेमार्ग याबाबत पर्याय सुचवण्यात येणार आहे.

याशिवाय देशात सात नवीन द्रूतगती रेल्वमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यात येणार आहे. या आर्थिक व्यवहार्यता तसेच बुलेट ट्रेन सुरू झाल्यास मिळू शकणारे प्रवासी याचाही अभ्यास केला जाणार आहे.

मुंबई ते नागपूर (७४१ किलोमीटर), मुंबई ते हैदराबाद (७११ किलोमीटर) तसेच दिल्ली ते वाराणसी (८६५ किलोमीटर) यासह सात रेल्वे मार्गाचा प्राथमिक सव्‍‌र्हे केला जाणार आहे.