08 March 2021

News Flash

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; नरखेड, रामटेक, वर्धा, भंडारा शहराला जोडणार

नागपूर : नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेड, भंडारा, वर्धा व रामटेक या शहरांना जोडणारा महामेट्रोच्या बहुप्रतिक्षित ब्रॉडगेज (बीजी) मेट्रो प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी  मंजुरी दिली. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. एकदा त्याची  मान्यता मिळाल्यवर भारतीय रेल्वेच्या रुळावरून मेट्रो धाऊ लागेल.

महामेट्रोच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून याद्वारे नागपूर व चार उपग्रह शहरे यांच्यात वातानुकूलित, वेगवान, विश्वासार्ह आणि आरामदायक सेवा उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेच्या विद्यमान पायाभूत सुविधांचा उपयोग करून प्रवासी वाहतूक प्रदान करणारी ही देशातील एकमेव सेवा ठरणार आहे.

नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर मार्गाचा समावेश आहे. या मार्गावर ११ स्थानके राहणार आहेत. नागपूर शहरातून होणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महामेट्रो आणि मध्य रेल्वे यांच्यात २०१८ मध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यातील पहिला टप्पा २०२१ ते २०३१ या काळात  दुसरा टप्पा २०३१ नंतर सुरू होणार आहे. यात नागपूर ते नरखेड हा ८५.५३ किमी, नागपूर-वर्धा ७८.८ किमी, नागपूर-रामटेक ४१.६ व नागपूर-भंडारा रोड हा ६२.७ किलोमीटर रेल्वेमार्गाचा समावेश राहणार आहे. नागपूरच्या जवळच्या गावातून नागपुरात ये-जा करणाऱ्यांची भविष्यात संख्या वाढणार आहे. त्यांची वाहतूक सुलभ होण्यासाठी आणि रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी मानक कार्य प्रणालीची प्रतीक्षा

राज्य सरकारने गुरुवारपासून मेट्रो सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी नागपूरकरांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी सरकारने मानक कार्यप्रणाली निर्धारित केली असून ती महामेट्रो कार्यालयाला बुधवापर्यंत प्राप्त झाली नव्हती. ती  आल्यावर मेट्रो सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महामेट्रो कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नागपूर-नरखेड मार्गासाठी ३३३ कोटी

मेट्रोची व्याप्ती नरखेडपर्यंत वाढवण्यात आल्याने त्याचा व्यवसाय वृद्धी आणि सर्वसामान्य जनतेला लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया या भागाचे आमदार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गडकरींकडून राज्य शासनाचे आभार

ब्रॉडगेज मेट्रोला मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. या प्रकल्पामुळे छोटय़ा शहरांना प्रवासी वाहतुकीचा लाभ होईल व वेळेची बचत होईल, असा दावा त्यांनी केला.

जलद प्रवास

स्थळ                    वेळ

नागपूर -वर्धा      १.१० मि

नागपूर-नरखेड    १.१५ मि.

नागपूर-रामटेक    १.१५ मि.

नागपूर-भंडारा     ०.५५ मि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:51 am

Web Title: green signal for broad gauge metro project zws 70
Next Stories
1 प्रादेशिक कोटा रद्द केल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ
2 करोनाकाळात कोटय़वधींचा खर्च करून शेकडो लोकांना रोजगार दिला
3 नवीन बाधितांहून करोनामुक्तांचे प्रमाण जास्तच
Just Now!
X