देशभरातील २७ शहरांच्या अभ्यासातून नीरीचा निष्कर्ष

नागपूर : शहरातील मोकळे आणि अधिक हिरवळ असणारे क्षेत्र लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरले आहेत. हे क्षेत्र पर्यावरणीय सेवा तर प्रदान करतातच, पण त्याचबरोबर जैवविविधता आणि आरोग्यसेवा देखील पुरवतात. करोनासारख्या आरोग्य संकटात या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले. सीएसआयआर-नीरीचे माजी संचालक डॉ. राके श कु मार व त्यांच्या सहकाऱ्यांनी  टाळेबंदीच्या आधी आणि नंतर अशा दोन श्रेणीत के लेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला.

ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागपूरसह नांदेड, गडचिरोली, पुणे, नाशिक, मुंबई, सिन्नर, सुरत, अंकलेश्वर, निजामपूर, फरिदाबाद, वडोदरा, आष्टी, शामली, दिल्ली, रेवा, भोपाळ, काटोल, मालेगाव, औरंगाबाद, नांदेड, लखनऊ, कानपूर, जबलपूर, बोकारो, कोलकाता, चेन्नई २७ शहरांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. यासाठी २० ते ४०, ४१ ते ६० आणि ६१ ते त्याहून अधिक वयोगट अशा तीन गटात सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासादरम्यान शहरातील हिरवळीच्या आणि मोकळ्या जागांची गरज, वापराचे स्वरूप, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांमधील बदल तपासण्यात आले. या सर्वेक्षणासाठी २७ शहरांमधून १७० जणांनी प्रतिसाद दिला.

करोनाकाळात सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता यासारख्या योग्य खबरदारीच्या उपाययोजनांसह शहरातील खुल्या आणि हिरवळ असणाऱ्या जागांचा वापर के ला असता तर व्यक्तीच्या आरोग्यात अधिक सुधारणा झाली असती. करोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लोकांना करोनासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकाच जागेवर राहावे लागले. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतेसह शहरातील मोकळ्या आणि हिरवळीच्या जागेचे महत्त्व लोकांना कळले. करोनाआधी आणि नंतर झालेल्या या अभ्यासात शहरी भागातील रहिवाशांसाठी खुल्या आणि हिरव्या जागांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षात ६२.३५ टक्के लोकांना शहरातील मोकळ्या आणि हिरवळीच्या जागा वाढल्या पाहिजेत, असे मत नोंदवले.

३१.१८ टक्के लोकांचे, सध्या अस्तित्वात असलेल्या खुल्या आणि हिरवळीच्या क्षेत्रातील सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे असे म्हणणे आहे.

८५ टक्के लोकांनी करोनानंतर शहरातील मोकळ्या आणि हिरवळीच्या जागेत योग करणाऱ्यांची संख्या वाढली, असे असे मत नोंदवले.

९९ टक्के व्यक्तींनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिकदृट्या सक्षम राहण्यासाठी योग आणि आरोग्याशी संबंधित इतर उपक्र म राबवण्याकरिता हिरवळीच्या व मोकळ्या जागा वापरण्याची गरजव्यक्त केली.

मोकळ्या जागा शारीरिक व मानसिक आरोग्याचा सामना करण्यास मदत करतात असे मत ९० टक्के लोकांनी नोंदवले.