23 September 2020

News Flash

मॉल सुरू, मग व्यायामशाळा का नाही?

संचालकांचा सरकारला सवाल

संग्रहित छायाचित्र

संचालकांचा सरकारला सवाल

नागपूर : करोनामुळे शहरातील सर्व जिम (अत्याधुनिक व्यायामशाळा) गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे जिम व्यवसायिक मोठय़ा आíथक अडचणीत सापडले आहे. मात्र आता जवळपास सर्व बाजारपेठांसह मॉलही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु जिम अजूनही बंदच आहे. त्यामुळे जिम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिमचालकांकडून होत आहे.

गेल्या दशकभरात युवा पिढीमध्ये जिममध्ये जाण्याची नवी क्रेझ आली. दररोज पाहाटे अथवा सायंकाळी घराजवळच्या जिममध्ये युवकांची चांगलीच गर्दी होत असते. जिममध्ये व्यायामाची अत्याधुनिक सामुग्री असल्याने युवकांचा ओढा काही जास्त आहे.त्यामुळे शहरातील जिमची होणारी उलाढाल कोटय़वधींमध्ये आहे. शहरात जवळपास २०० ते ३०० जिम आहेत. यामध्ये भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत शेकडो युवकांसह, तरुणी व गृहिणीही येत असतात. जिममध्ये तुम्हाला डायट प्लानही देण्यात येतो. तसेच काही जिममध्ये पौष्टिक नाश्ताही ग्राहकांना देण्यात येतो. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणार रोजगारही मिळतो. शहरातील प्रत्येक जिममध्ये ३५ ते ५० प्रशिक्षक असतात. त्यामुळे एकूण जिममधील प्रशिक्षकांची संख्या हजारावर आहे. मात्र करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे सर्व जिम बंद असल्याने या व्यवसायशी निगडित हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. त्याशिवाय अनेक जिम मालक आíथक अडचणीत आहेत. अनेकांनी अत्याधुनिक सामुग्रीसाठी बँकेकडून कर्ज घेतले असून त्याचे हप्ते कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्य सरकारने बाजारपेठांसाठी टाळेबंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे दुकाने सुरू झाली आहेत. बुधवापासून शहरातील सर्व मॉलही सुरू झाले आहेत. मात्र जिमवर का बंदी, असा सवाल जिमचालकांनी उपस्थित केला आहे. आम्हीही मॉल आणि इतर सर्व व्यवसायांसाठी असलेल्या नियमावलीचे पालन करू, अशी विनंतीही जिम मालकांनी केली आहे.

पाच महिन्यांपासून जिम बंद आहेत. त्यामुळे सर्व जिमशी निगडित असलेले कर्मचारी, मालक आर्थिक अडचणींचा सामना करताहेत. शासनाने लवकरात लवकर जिम सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर करावी, आम्ही त्याचे पालन करू.

– अविनाश वाघुळे, अवीज् जिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:13 am

Web Title: gym owners demanding immediate reopening of gyms zws 70
Next Stories
1 राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेळघाट रेल्वेचा विषय गाजणार!
2 काँग्रेस मंत्र्यांमधील शीतयुद्ध विकोपाला?
3 नागपूरनगरीत ‘अयोध्येचा आनंद’!
Just Now!
X