29 November 2020

News Flash

समाजकंटकांनी पुन्हा २२ वाहने फोडली

गुंडांचे टोळके मद्याच्या नशेत होते.

(संग्रहित छायाचित्र)

अवैध जुगार अड्डय़ावरील वसुलीवरून हैदोस

नागपूर : गुन्हेगारी जगतातील आपसी वादातून सर्वसामान्य नागपूरकरांची वाहने फोडण्याचा संतापजनक प्रकार शहरात सुरूच असून आता पुन्हा यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही समाजकंटकांनी २२ दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. गुरुवारी मध्यरात्री सुमारे अर्धा तास गुंडांचा हा धिंगाणा सुरू होता. अवैध जुगार अड्डय़ावरील वसुलीवरून हे संपूर्ण प्रकरण घडल्याची माहिती आहे.

गुलशन बोकडे हा अवैध जुगार अड्डा चालवतो. त्याच्याकडून जुबेर कुरेशी हफ्ता घेतो. या  दोघांमधील वादातून गुरुवारी रात्री कमाल चौकात कुरेशीला मारहाण करण्यात आली. या घटनेचा वचपा काढण्यासाठी दुसऱ्या गटातील पाच ते सात गुंड यशोधरानगर परिसरात आले. त्यांनी पंचवटीनगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, गुरुवारी बाजार परिसरात आरडाओरड करीत नागरिकांना शिवीगाळ केली. तसेच परिसरातील सुमारे २२ वाहनांची तोडफोड केली.

गुंडांचे टोळके मद्याच्या नशेत होते. ते नागरिकांना धमकावत होते. त्यामुळ ेकोणीही त्यांना अडवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याही स्थितीत काहींनी आरडाओरड केल्यावर गुंड पळून गेले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस ताफा येईपर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी यशोधरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी केली. शुक्रवारी दुपापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले. यात फरदीन खान, कामील आलम, अब्दुल शाहिद आणि १ अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

पोलिसांची दहशत संपली का?

कठोर कारवाईअभावी गुंडांची हिंम्मत वाडली आहे. त्यातूनच वाहने फोडण्याच्या संतापजनक घटना सातत्याने घडत आहेत. लोकांचे नुकसान झाल्यावर पोलीस पंचनामा करायला पोहोचतात. परंतु या गुंडांच्या मुसक्या आधीच का आवळल्या जात नाहीत, रात्री भर रस्त्यावर हे गुंड असा धिंगाणा घालत असताना पोलिसांचे फिरते पथक कुठे असते की शहर पोलिसांची दहशतच आता संपली आहे, असे प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:14 am

Web Title: haidos from the collection of illegal gambling establishments crime news nagpur akp 94
Next Stories
1 अतिक्रमणाचा प्रश्न कायद्याने सुटणार नाही, त्यासाठी लोकचळवळ हवी!
2 रोजगार मागणारे नव्हे,  रोजगार देणारे बना!
3 स्थलांतरित प्रजातींमध्ये आशियाई हत्ती, माळढोकच्या समावेशाचा प्रस्ताव
Just Now!
X