उच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा रद्द

भंडाऱ्यातील प्रीती बारिया हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने दोघांना ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेत परावर्तीत केली.

आमीर शेख आणि सचिन राऊ त अशी आरोपींची नावे आहेत. ए.सी. दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसून तिघांवर केलेल्या हल्लय़ात प्रीती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन मुलांना कायमचे अपंगत्व आले. ३० जुलै २०१५ ला ही घटना घडली होती. चोरटय़ांनी रूपेश बारिया यांच्या पत्नी प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बारिया यांच्यावर वार केल्यानंतर चोरटय़ांनी सोने-चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजारांची रोकड चोरली होती. त्यानंतर आरोपींनी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी रवींद्र शिंदे यांच्या घरीही चोरी केली. त्यांच्या घरात शिरतानाही या दोघांनीही एसी दुरुस्तीचेच कारण सांगितले होते. यावेळी या दोघांनी शिंदे यांच्या घरी एकटीच असलेली त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यात हातोडीने वार केले होते. त्यानंतर शिंदे यांच्या घरातले दागिने, लॅपटॉप आणि एटीएम कार्डही चोरले होते.

शिंदे यांच्या घरातून चोरलेले एटीएम कार्ड वापरून त्यांनी एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांना या चोरटय़ांची माहिती मिळाली व लोकेशनवरूनच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. आमीर शेख आणि सचिन राऊ त या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांनी निकाल देत फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. ओ.डब्ल्यू. गुप्ता आणि सरकारतर्फे अ‍ॅड. निरज जावडे यांनी काम पाहिले.

ए.सी. दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसून तिघांवर केलेल्या हल्लय़ात प्रीती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन मुलांना कायमचे अपंगत्व आले. ३० जुलै २०१५ ला ही घटना घडली होती. चोरटय़ांनी रूपेश बारिया यांच्या पत्नी प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते.बारिया यांच्यावर वार केल्यानंतर चोरटय़ांनी सोने-चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजारांची रोकड चोरली होती.