06 July 2020

News Flash

गृहमंत्र्यांची प्रतिबंधित क्षेत्रांना भेट

संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींची अखेर दखल

संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींची अखेर दखल

नागपूर : करोना रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील अनेक भागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. परंतु या परिसरात विविध प्रतिबंध घालताना तेथील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सर्वच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये संतापाचे सूर व्यक्त होऊ लागले होते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गुरुवारी या भागात जाऊन लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय  यांच्यासोबत  तांडापेठ-नाईक तलाव-शांतीनगर-हिवरी नगर-श्रीकृष्ण नगर,वाठोड- गड्डीगोदाम इ. ठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला तसेच या भागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रामुळे त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतोय, याचा पाढाच वाचला. गृहमंत्र्यांच्या या दौऱ्यात  पोलीस उपायुक्त  राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त निर्मला देवी, पोलीस उपायुक्त विनीता साहू उपस्थित होत्या.

‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ची घोषणा

शहरात २४ तासांत चार खुनाच्या घटना घडल्याने पोलीस प्रशासन हादरले असून आज गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय  यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ची घोषण केली. उद्यापासून १० दिवस ही विशेष मोहीम चालणार आहे. यादरम्यान अहवालावरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी आपापल्या हद्दीत पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 4:41 am

Web Title: home minister anil deshmukh visit to restricted areas zws 70
Next Stories
1 coronavirus : करोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू
2 संचारबंदी शिथिल होताच उपराजधानीत हत्यासत्र
3 प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवा
Just Now!
X