08 March 2021

News Flash

समाजकार्याचा वसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या आदर्श कन्या!

डॉ. अपर्णा लांजेवार या हैद्राबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी आणि परदेशी भाषा विभागात प्राध्यापक आहेत

‘झिरो ग्रॅव्हिटी’ उपक्रमाअंतर्गत रंगवलेल्या शासकीय शाळा.

वडिलांच्या अकाली निधनानंतर सांभाळली धुरा

पालकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून समाजकार्याचा वसा हाती घेतला. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर ते काम थांबेल, असे वाटत असतानाच त्यांच्या मुलींनी ते काम पुढे नेऊन एक आदर्श निर्माण केला. त्यात मधुरा राधा पांडुरंग बोर्डे, मैत्रेयी श्रीकांत जिचकार आणि  समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तहहयात सक्रिय राहिलेल्या ज्योती लांजेवार यांची मुलगी अपर्णा लांजेवार यांची नावे घेता येईल.

गेल्यावर्षीपर्यंत उत्कर्ष असोसिएशन फॉर ब्लाईंड  आणि लुई राम वाचनालयाच्या सर्वेसर्वा म्हणून राधा बोर्डे यांचे नाव सर्वश्रूत आहे. दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन राधाताईंचे मागील वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली. अंध मुलींचे शिक्षण, अंध आणि डोळसांसाठी असलेले वाचनालय, त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणारे वेगवेगळे कार्यक्रम कोण घेणार? एवढय़ा सक्रियपणे कोण अंधांच्या हातातील काठी होणार? असे प्रश्न संस्थेशी जुळलेल्या व्यंग-अव्यंगांच्या मनात निर्माण होत असतानाच मधुराने संस्थेची धुरा हाती घेतली.

मधुरा जेएनयूची विद्यार्थिनी, सध्या महापालिकेत काम करते, पण आईची अंधांसाठी असलेली तळमळ माहिती असल्यामुळे आईचे काम अपूर्ण ठेवायचे नाही, हा निर्धार करून तिने नुकताच ‘८वा जागतिक पांढरी काठी दिवस’ कार्यक्रम नियोजित स्थळी आयोजित केला. दरवर्षीप्रमाणे पांढऱ्या काठय़ांचे वाटप, शिष्यवृत्ती प्रदान करणे, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि धान्य व फराळ वाटप यावेळी करण्यात आले. राधाताईंनी हाती घेतलेले काम मधुराच्या रूपाने योग्य हाती गेल्याची पावती ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ. उदय बोधनकर, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमाताई साखरे, सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रियेतून दिली.

तीच गोष्ट मैत्रेयीची! डॉ. श्रीकांत जिचकार हे नाव राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांना माहिती आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी सामाजिक कार्यासाठी अतिशय संवेदनशीलतेने शिक्षण आणि बालगृहातील मुलींसाठी करीत आहे, हे विशेष. डॉ. जिचकार गेले तेव्हा मैत्रेयी जेमतेम १७ वर्षांची होती. त्याचवेळी डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली होती. त्यातील एक उपक्रम ‘झिरो ग्रॅव्हिटी’ची मैत्रेयी संस्थापक आहे. ‘इतरांच्या आनंदात आनंद शोधा आणि समाजातील वंचितांचे जगणे अधिक सुसह्य़ होईल यासाठी प्रयत्न करा’, या डॉ. जिचकारांची शिकवण तिने तंतोतंत अंगिकारली. त्यामुळेच सरकारी शाळांचे ‘मेक ओव्हर’ करण्यासाठी तिच्या संस्थेला देशभरातील संपर्क साधण्यात येत आहे.

डॉ. अपर्णा लांजेवार या हैद्राबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी आणि परदेशी भाषा विभागात प्राध्यापक आहेत. त्यांनी आई  ज्योती लांजेवार यांच्या नावाने स्थापन स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्य, रिपब्लिकन विचार पुढे नेण्यासाठी काम सुरू केले. यंदा त्याचे पाचवे वर्ष आहे.

हा देश रिपब्लिकन असून लोकांची सत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती. तेव्हा प्रतिष्ठानच्या कवी, कादंबरीकार, कथाकार, कार्यकर्ते यांना व्यक्त होण्याचे एक हक्काचे सधन प्राप्त झाले आहे.

‘झिरो ग्रॅव्हिटी’ म्हणजे कितीही अडथळा आला तरी चांगले काम पूर्णत्वास जातेच. आपल्याकडील ७५ टक्के मुले सरकारी शाळांमध्ये शिकतात. मात्र, त्यांची अवस्था, तेथील पायाभूत सुविधा प्रेरणादायी नसतात. खरे तर मुलांच्या जीवनात रंग असायला हवेत. यातून त्यांना प्रेरणा घेता यावी म्हणून सरकारी शाळांना ‘मेक ओव्हर’करण्याचे काम हाती घेतले. काटोल मार्गावरील मुलींच्या बाल सुधारगृहाची रंगरंगोटी केली. तेथे पायाभूत सुविधा निर्माण केल्या.त्यामुळे तेथील मुलांच्या जीवनात एक वेगळे हास्य आम्ही पाहतो आहोत. कारण तेथून पळून जाण्याचाच विचार करणाऱ्या मुलींच्या जगण्यात एक सकारात्मकता आली आहे. त्या त्यांच्या करिअरविषयी आणि शिक्षणाविषयीही विचार करू लागल्या आहेत. बाबांना (श्रीकांत जिचकार) हेच अपेक्षित होते. त्यांची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीत आहे.’’

– मैत्रेयी जिचकार, संस्थापिका, झिरो ग्रॅव्हिटी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:11 am

Web Title: ideal daughter of societys father supporter
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर!
2 राम मंदिरासाठी आज नागपुरातून ‘हुंकार’
3 अन्नदाता सुखी असेल तर देश सुखी होईल
Just Now!
X