13 December 2018

News Flash

भाजपला स्वबळावर ३५० जागा हव्या असल्यास दुसऱ्याच राज्यांवर लक्ष द्यावे

शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागाजिंकताच येत नाही.

दिवाकर रावते, परिवहनमंत्री

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे मत

भाजपला पुढील लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त जागा जिंकायच्या असल्यास त्यांनी दुसऱ्याच राज्यांवर लक्ष केंद्रित करावे. महाराष्ट्रात शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागा मिळूच शकत नाही, असे मत शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. नागपूरला आले असता निवडक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

भाजप नेत्यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सर्वच राज्यांत भाजपला जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत, परंतु महाराष्ट्रात शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेला वगळून भाजपला राज्यात जास्त जागाजिंकताच येत नाही.

ही कमी जागांची उणीव भरण्यासाठी त्यांना इतर राज्यांवरच लक्ष देण्याची गरज आहे. शिवसेनाकडून लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागपूरसह विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्य़ांत पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करायची आहे. नागपूर जिल्ह्य़ात काम सुरू केले आहे. येथे प्रत्येक जागेवर शिवसेना उमेदवार उभे करून जिंकण्याचा प्रयत्न होईल. राज्यातील सर्वच ठिकाणचा विचार केल्यास एकूण मतदारांतील सुमारे ६० टक्के मते ही विविध पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार हमखास मिळतात, तर ४० टक्के मते ही कोणत्याही पक्षाकडे वळू शकतात. या मतांवरच उमेदवार निवडून येतात. ही मते मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैशाचा वापर होत आहे. भाजपही अशा मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैसे खर्च केल्या जात असल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी केला.

First Published on January 8, 2018 2:52 am

Web Title: if bjp wants 350 seats on its own then pay attention to other states