News Flash

सुधार प्रन्यास अखेर महापालिकेत विलीन होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने नासुप्र महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्र्यांची घोषणा, १५ ऑगस्टपूर्वी निर्णय

नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब लावणाऱ्या राज्य शासनाने अखेर यासाठी मुहूर्त शोधला आहे. १४ ऑगस्टपूर्वी नागपूर सुधार प्रन्यासचे महापालिकेत विलीन करण्याचा शासन निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

मुंबईत सह्य़ाद्री अतिथीगृहात गुरुवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात वरील निर्णय झाला. सध्या उच्च न्यायालयाने बरखास्तीला स्थगिती दिली आहे.  नागपूर सुधार प्रन्यासच्या सर्व मालमत्ता महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. नासुप्र सभापती आणि महापालिका आयुक्त यांच्यात करार होईल. तसेच न्यायालयीन प्रकरणेही मनपाला हस्तांतरित करण्यात येतील. कर्मचारी मनपात किंवा एनएमआरडीएकडे वर्गीकृत करण्यात येतील. नासुप्रची प्रशासकीय इमारत वगळून नासुप्रच्या शहरातील सर्व मालमत्ता महापालिकेच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. नासुप्र बरखास्त करून मनपात विलीन करण्याची जुनी मागणी होती. त्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने नासुप्र महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:50 am

Web Title: improvement trust will be merged with nagpur municipal corporation abn 97
Next Stories
1 महापालिका, प्रन्यासचे १५६ कर्मचारी एनएमआरडीएत
2 कारचालकाच्या घरी जाऊन दंड वसुली
3 म्हाडाच्या चुकीचा शहरातील शेकडो गाळेधारकांना फटका
Just Now!
X