महेश बोकडे

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यला कोविशिल्ड लसीच्या ८३ हजार ९०० कुप्या मिळणार आहेत. २० जानेवारीला त्यावर शिक्कामोर्तब झाले. ८ लाख ३९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना  त्याचा लाभ होणार आहे.

एका कुपीत दहा नागरिकांना देता येईल एवढी लसीची मात्रा असते. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक १२ हजार ५५० कुप्यांचा पुरवठा मुंबईला होईल, तर ठाण्याला ६,४५०, रायगड १,१००, पालघरला १,५५० कुप्या दिल्या जातील. नाशिकला ३,५००, अहमदनगर ३,१००, धुळ १,०००, नंदूरबार १,०५०, जळगाव येथे १,९००, पुणे ११,१५०, सोलापूर २,७००, सातारा २,३५०, कोल्हापूर ३,१५०, रत्नागिरी १,३००, सांगली २,७००, सिंधुदुर्गला ८५० कुप्यांचा पुरवठा होईल.

अकोला येथे ९००, अमरावती १,४५०, बुलढाणा १,७५०, वाशीम ५००, यवतमाळ १,५००, औरंगाबाद ३,६००, हिंगोली  ५५०, जालना  १,३००, परभणी  ८००, लातूर  १,७५०, बीड  १,४५०, नांदेड  १,४५०, उस्मानाबाद ९००, नागपूर  ३,८५०, भंडारा  ७५०, चंद्रपूर १,६००, गडचिरोली  ९५०, गोंदिया  ८०० तर वर्धा येथे १,६५० कुप्यांचा पुरवठा होणार आहे. राज्यभरात एकूण ८३ हजार ९०० लसींच्या कुप्यांचा पुरवठा होणार असल्याने तब्बल ८ लाख ३९ हजार नागरिकांना लस घेता येईल.

या विषयावर राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना ९६ हजार लसी मिळणार असल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.