वैद्यकीय यंत्रणेची दिवस-रात्र अविरत सेवा

नागपूर :  मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये प्रथमच करोना संशयित रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून चादर, मास्कसह आवश्यक वस्तूंची खरेदी के ली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून विदेश प्रवासाची पाश्र्वभूमी असलेल्यांसह करोनाग्रस्ताच्या संपर्कातील प्रत्येकाला तातडीने सक्तीच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला आहे.

येथील डॉक्टरांकडूनही दिवस-रात्र सेवा दिली जात आहे.  मेयोच्या प्रयोगशाळेतही २४ तास तपासणी सुरू  आहे. काही रुग्णांनी वार्डात डासांची तक्रार करताच तातडीने येथील खिडक्यांना जाळी लावण्यात आली. सोबत खबरदारी म्हणून मेडिकलच्या विविध  भागात नियमित र्निजतुकीकरणाची प्रक्रिया के ली जात आहे.  येथील करोनाग्रस्त व संशयित रुग्णांसह त्यांच्या जवळपासच्या वार्डासह भागातही दिवसातून तीन वेळा  स्वच्छता राखली जात आहे. यावर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उपअधीक्षक डॉ. कं चन वानखेडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक दोन ते तीन तासात येथील रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात असून  करोनाग्रस्ताच्या वार्डात निवडक व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे.

मेयोतही अधिष्ठाता डॉ. अजय के वलिया यांच्यासह इतर अधिकारी पूर्ण वेळ  रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत.

 

मेडिकलमध्ये रुग्णांचा वावर असलेल्या ठिकाणी कीटकनाशक फवारताना कर्मचारी.