अकरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार

अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत असल्याने आधीच उपराजधानीतील समाजमन संतप्त झाले आहे. असाच निंदनिय प्रकार पुन्हा घडला असून एका अकरा वर्षांच्या मुलीवर दोन मुलांनी सामूहिक बलात्कार करून  चित्रफित तयार केली. हा प्रकार कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला आहे. या प्रकरणी दोन मुलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना बाल सुधारगृहात पाठवले. दुसऱ्या घटनेत शिकवणीच्या शिक्षकाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून अश्लील चित्रफितही तयार केल्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. तिसऱ्या घटनेत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.

पहिल्या घटनेतील पीडित ११ वर्षीय मुलगी आपल्या आईवडिलांसह कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाते. गेल्या जुलै महिन्यात पीडित मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. एकजण बलात्कार करीत असताना दुसरा मोबाईलमध्ये चित्रफित तयार करीत होता. मुलीच्या स्वभावात बदल झाल्याने आईने  मुलीची कसून चौकशी केली असता तिने सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पारधी यांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात  आली.

दुसऱ्या घटनेत शिकवणीच्या शिक्षकाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून अश्लील चित्रफितही तयार केली. साईबल सुनील चौधरी, त्रिमूर्तीनगर असे शिक्षकाचे नाव आहे. आरोपीची विद्यार्थिनीवर वाईट नजर होती. सर्व विद्यार्थी  निघून गेल्यावर तो तिला एक्?स्ट्रा क्?लासच्या नावावर थांबवून ठेवायचा. गेल्या १५ जुलैला त्याने तिच्यावर बलात्कार केला.  मोबाईलमध्ये चित्रफित तयार केली व  कुणाकडे वाच्यता केल्यास फेसबूक व व्हॉट्स अ‍ॅपवर टाकण्याची धमकी दिली आणि पुन्हा अत्याचार केला. प्रकृती खराब झाल्यानंतर आईने मुलीकडे विचारणा केली असता तिने सर्व हकिगत सांगितली. त्यांनी

पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या घटनेत लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या मुलाने समवयस्क मुलीवर बलात्कार केल्याची तिसरी घटना कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. आरोपीने  लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळयात ओढले. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलातकर केला.  याची माहिती मुलीच्या घरच्यांना समजली. मुलीच्या आईवडिलांनी तिची विचारणा केली असता तिने आरोपी हा लग्न करणार असल्याचे सांगितले. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे  पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलाला ताब्यात घेतले.