मंगेश राऊत

मुलामुलींचे अपहरण करणे, पळवून नेण्याचे प्रमाण राज्यात दिवसेंदिवस वाढत असून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल गुन्ह्य़ांमधील ७ हजार ३३० मुलामुलींचा शोध अद्यापही लागलेला नाही. या मुलामुलींचा  शोध कसा लागणार, पोलीस यंत्रणेने गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण करून  जबाबदारी झटकून दिली का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

लग्न, घरकाम, बलात्कार, खंडणी मागणे आदींसाठी मुलामुलींचे अपहरण करण्याचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, राज्यात २०१९ मध्ये १२ हजार १३० जणांचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी ११ हजार ७५३ हे १८ वर्षे वयोगटातील मुलेमुली होत्या. त्यापैकी ७ हजार ३३० मुलेमुली अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला  यश आलेले नाही.

गुन्ह्य़ात झालेली वाढ

वर्ष                  गुन्हे

२०१७         १०३२४

२०१८         ११४४३

२०१९         १२१३०