पुण्यात झालेल्या कारवाईनंतर माहिती समोर

नागपूर : वाघांच्या शिकारींचे पश्चिाम महाराष्ट्र ते गुजरात ‘कनेक्शन’ समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या कारवाईनंतर संपूर्ण महाराष्ट्रातच वाघांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वाघांचे अवयव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यापासून व आरोपींना जामीन मिळण्यापासून रोखण्यात वनखात्याला यश आले आहे.

मध्यभारत ही शिकाऱ्यांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. नागपूर ते मध्यप्रदेश या पट्ट्यात वाघाच्या सर्वाधिक शिकारी झाल्या.

भारतात पहिल्या सहा महिन्यांतच ८६ वाघ मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक २२ वाघ महाराष्ट्रात मारले गेले. मागील वर्षीच्या तुलनेत वाघांच्या मृत्यूची  आकडेवारी वाढल्याने व्याघ्रसंरक्षणाचे आव्हान वनखात्यासमोर उभे ठाकले आहे. विदर्भात सर्वाधिक वाघ असल्याने शिकाऱ्यांचा मोर्चाही विदर्भाकडे, असाच आजवरचा समज होता. मात्र, आता पश्चिाम महाराष्ट्रालाही शिकाऱ्यांनी लक्ष्य के ले आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी वाघ व बिबट्याच्या कातड्यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली. पुणे वनविभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने ही कारवाई केली.

आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनी २९ जुलैला नागपूर वनखात्याने वाघांच्या शिकाऱ्यांना अटक करुन मोठी कामगिरी पार पाडली. गेल्या दीड महिन्यांपासून हे अटकसत्र सुरूच असून आतापर्यंत सहा ते सात प्रकरणात  सुमारे २९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत खात्याची कायदेशीर बाजू कमकू वत असल्याने आरोपींना शिक्षा मिळण्याचे प्रमाण फार कमी होते. मात्र, या प्रकरणांमध्ये आरोपींची जामिनावर सुटका होऊ नये याकरिता कायदेशीर बाजू कणखरपणे सांभाळल्याने हे सर्व आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणात स्थानिक शिकाऱ्यांना जरब बसेल, अशी कामगिरी पार पाडली जाईल, असा विश्वास खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.