News Flash

भारताने २०१६ पूर्वी कधीच सर्जिकल स्ट्राईक केला नाही

लेफ्ट. जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

भारताने पाकिस्तानच्या विरोधात २०१६ च्या पूर्वी कधीही सर्जिकल ट्राईक केला नव्हता, असा दावा लेफ्ट. जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांनी केला. प्रहार शाळेत कारगिल विजय दिवस गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

सर्जिकल स्ट्राईकच्या संपूर्ण चित्रफितीची सीडी लष्कर प्रमुखांकडे उपलब्ध आहे, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पुरावे मागून आपल्या सशस्त्र दलाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही अतिशय निंदनीय बाब होती, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्याची क्षमता विकसित कशी करावी, यासाठी त्यांचे लष्करातील अनुभव कथन करून सर्जिकल स्ट्राईकबद्दल सविस्तर विवेचन केले.

ते म्हणाले, भारताला त्रास देणाऱ्या आणि पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करायचा, परंतु तेथील नागरिकांना इजा पोहचवायची नाही म्हणून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. दहशतवाद्यांनी १८ जवानांना ठार केले होते. त्यानंतर पाकिस्तानला भारत सर्जिकल स्ट्राईक करेल, असे वाटले नाही. कारण यापूर्वी अशा अनेक घटना घडून केवळ ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ अशा गप्पा करण्यापलीकडे काही झाले नव्हते. जास्तीत जास्त भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने थांबवण्यात येत होते. त्यामुळे त्यांना असे काही भारताकडून होईल. याची कल्पना नव्हती. त्याचा परिणाम म्हणजे ते नियंत्रण रेषेवर सतर्क नव्हते. भारतीय सशस्त्र दलांनी अंधारी रात्र (अमावास्या) या अभियानासाठी निवडली. तसेच शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमी काव्याचा वापर केला. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना काही कळायच्या आत सर्जिकल स्ट्राईक पूर्ण झाला. आपला एकही सैनिक शहीद झाला नाही. या अभियानाची कल्पना पंतप्रधान आणि लष्करी अधिकारी अशा १५ ते १६ जणांना होती. जनरल सुहाना यांना अभियानाची चित्रफित बनवायाचे आदेश दिले होते. या आदेशामुळे मला थोडे वाईट वाटले. परंतु देशातील दोन-तीन नेत्यांनी अभियानावर प्रश्नचिन्ह लावल्याने तर या आदेशाचे महत्त्व मला कळले. अतिशय गोपनीय असलेल्या अभियानात केवळ कोडवर्डचा वापर झाला. पहाटे सव्वातीन ते चारच्या दरम्यान हे अभियान पार पडले. कारण, या वेळेत मानवी शरीर सुस्तावलेले असते. तसेच भारतीय सशस्त्र दल धर्मनिरपेक्ष असल्याने वेळ निवडण्यात आली. पहिली नमाज पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान होते. म्हणून सव्वातीन वाजता अभियान सुरू करून चारच्या आत संपवायचे अशी योजना आखली होती. हे अभियान १५ मिनिटात यशस्वी झाले, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 1:57 am

Web Title: india has never had a surgical strike before abn 97
Next Stories
1 राष्ट्रीय खाण आरोग्य संस्थेच्या विलीनीकरणास खा. धानोरकरांचा विरोध
2 बदली रोखण्यासाठी ‘डिफॉल्टर’ पोलिसांची धडपड
3 शरीरसुखाचे आमिष दाखवून एक लाखासाठी तरुणाचे अपहरण
Just Now!
X