|| अविष्कार देशमुख,

एक वर्षात १.१६ लाख नवे गुंतवणूकदार

नागपूर : बँकांच्या तुलनेत टपाल खात्याच्या योजनेत असलेला अधिक परतावा  तसेच सुरक्षेच्या हमीसोबतच इतर नियमांबाबतही असलेली शिथिलता यामुळे  टपाल खात्याच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचा वैदर्भीयांचा कल वाढलेला आहे. मार्च २०२० मध्ये  टपाल खात्याच्या चार योजनांमध्ये गुंतवणूक  करणाऱ्यांची संख्या ५ लाख ४५ हजार ४१४  होती.  मार्च २०२१ मध्ये ही संख्या ६ लाख ६१ हजार ९५७  एवढी  झाली. एका वर्षात एकू ण १  लाख १६ हजार ५४३ गुंतवणूकदार वाढले.  करोना काळात योग्य गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही नागरिकांचा कल टपाल खात्याकडे वाढलेला दिसून येत आहे.

मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न व तत्सम कामांसाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून टपाल खात्याच्या योजनांकडे पाहिले जाते. यात  प्रामुख्याने मुदत ठेवी, ज्येषठ नागरिक बचत योजना, भविष्य निर्वाह निधी योजना आणि सुकन्या समृद्धी योजनांचा समावेश होतो.

विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्यामागे ठेवी अल्पमुदतीच्या योजना (एक, दोन, तीन व पाच वर्षे)  व  बँकेच्या तुलनेत टपाल खात्याच्या बहुतांश योजनेतून मिळणारा अधिक परतावा ही प्रमुख कारणे आहेत, असा टपाल खात्याचा दावा आहे. टपाल खात्याच्या योजनेत एक, दोन व तीन वर्षांच्या कालावधीत सावधी योजनेत ५.५ टक्के व्याजदर मिळते, तर पाच वर्षांसाठी ठेवी असेल तर ६.७ टक्केव्याज  मिळते. ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनेवर ७.४ टक्के तर सुक न्या समृद्धी योजनेत सर्वाधिक ७.५ टक्के व्याज मिळते. त्यातुलनेत खाजगी बँकेत एक वर्षाच्या मुदत ठेवीवर  ४.९ टक्के, दोन वर्षासाठी ५.१५ टक्के, ३ वर्षांसाठी ५.३० टक्के तर पाच वर्षांसाठी ५.५० टक्के व्याज मिळते. खाजगी बँकेत खाते असलेली शाखा वगळता इतर शाखेत एक लाख रुपये जमा केल्यास त्यावर पाचशे रुपये अधिक मोजावे लागतात. टपाल खात्यात कोणत्याही शाखेत तुम्ही पैसे जमा के ल्यास अतिरिक्त पैसे आकारले जात नाही. खासगी किं वा राष्ट्रीयीकृत बँकांकडून पैसे काढताना अथवा जमा करताना ग्राहकांकडून शुल्क आकारणी के ली जाते. त्यामुळेही गुंतणूकदारांचा कल टपाल खात्यांच्या योजनांकडे वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मुदत ठेवीतील गुंतवणूक अनेकांच्या उपयोगी आली हे येथे उलेखनीय.

पोस्टमास्टर जनरल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये मुदत ठेव योजनेत १ लाख ८२ हजार ४३ लोकांनी,भविष्य निर्वाह निधी योजनेत ५८,२४२ लोकांनी, सुकन्या समृद्धी योजनेत २ लाख ७५ हजार आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत २ ९हजार ६७७ नागरिकांनी गुंतवणूक के ली.

मार्च २०२१ मध्ये मुदत ठेव योजनेत २ लाख १२ हजार ५६९ , भविष्य निर्वाह निधी योजनेत ७० हजार ५७०, सुकन्या समृद्धी योजनेत ३ लाख ३८ हजार ३६० व २०२० मध्ये  गुंतवणूक के ली. यंदा ही संख्या ७० हजार ५७० वर गेली. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेत ४० हजार ४५८ नागरिकांनी गुंतवणूक के ली.

 

टपाल खात्यात सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आहेत. यात  गुंतवणूक केल्यास सर्वात जास्त परतावा मिळतो, तो बँकेच्या काही योजनेपेक्षा अधिक आहे. शिवाय सुरक्षित ठेवी म्हणून लोक टपाल खात्याकडे बघतात. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात पोस्टाच्या विविध योजनेतील ठेवीत वाढ झाली आहे. – रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल नागपूर विभाग.