09 December 2019

News Flash

रेल्वे स्वत:च पाण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत

कोराडीतून रेल्वेस्थानकापर्यंत जलवाहिनीचा प्रस्ताव

कोराडीतून रेल्वेस्थानकापर्यंत जलवाहिनीचा प्रस्ताव; अधिकाऱ्यांची महापालिकेशी चर्चा

नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाचा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वेने नागपूर स्थानकावर पाणी पुरवठय़ासाठी कोराडी येथून थेट जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंदर्भात नागपूर महापालिकेशी चर्चा देखील सुरू आहे.

नागपूर शहराला पाणीटंचाईचा फटका बसला आहे. सध्या सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा रेल्वेला देखील केला जात आहे. नागपूर हे देशातील सर्वात मोठे जंक्शन असून येथे दररोज १२० रेल्वेगाडय़ांची ये-जा असते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. अपुरा पाऊस आणि पाण्याचा तुटवडा बघता मध्य रेल्वेने त्यावर मात करण्यासाठी दीर्घ उपाययोजनांवर विचार सुरू केला आहे. रेल्वेस्थानकावर आवश्यक पाणी नियमित मिळावे म्हणून रेल्वेचे अधिकारी गेल्या आठवडय़ात महापालिका आयुक्तांना भेटले व  कन्हान नदीतून जलवाहिनीद्वारे थेट रेल्वेस्थानकावर पाणी आणण्याच्या योजनेच्या प्रस्तावावर चर्चा केली, असे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेला आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोराडी येथून पाणी आणण्याचा विचार करीत आहे. सिंचन विभागाच्या चार उपसासिंचन योजना कोराडी नदीवर प्रस्तावित आहेत. ही नदी विनाअडथळा वाहत असून सध्यातरी त्यावर धरण प्रस्तावित नाही. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच या नदीवर चार योजनांना मान्यता दिली आहे. त्याचा फायदा रेल्वेला होऊ शकतो. चारपैकी एक उपसासिंचन योजना रेल्वेसाठी होऊ शकतो. सध्यातरी हा प्रकल्प  कागदावर आहे. परंतु थेट जलवाहिनी टाकण्याबाबत

विभागात चर्चा सुरू आहे, असेही म्हणाले. जलवाहिनी टाकण्याचा खर्च थोडा जास्त आहे, परंतु त्याशिवाय चांगला पर्याय सध्यातरी दिसत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रेल्वेने  पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून स्थानकावर पाण्याची बचत करण्यासाठी आणि नासाडी थांबण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या नागपूर स्थानकाला ३०० मीटर व्यासाच्या जलवाहिनीने राजभवन जलकुंभातून पाणी मिळते. हे पाणी पेंचमधून येते. दरम्यान, मध्य रेल्वेचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी या प्रकल्पाबाबत अनभिज्ञता दर्शवली.

रोज दोन लाख लिटर पाण्याची गरज

रेल्वेकडे ४.५ लाख लिटरचे तीन भूमिगत जलकुंभ आहेत. त्यापैकी एक ३.२० लाख लिटरचा आहे. रेल्वेला पाण्याची सर्वात अधिक गरज डब्यांमध्ये भरण्यासाठी असते. नागपूर जंक्शवर १२० गाडय़ांच्या डब्यामध्ये पाणी भरावे लागते. तसेच नागपूर स्थानकाची दररोजची गरज सुमारे ४० लाख लिटर आहे. तसेच स्थानकावर पिण्यासाठी दोन लाख लिटर पाण्याची गजर भासते.

First Published on August 13, 2019 4:45 am

Web Title: indian railways water line nagpur municipal corporation
Just Now!
X