16 October 2019

News Flash

लघु व मध्यम उद्योगांवर आज सर्वंकष चर्चा

यात लघु व मध्यम उद्योगांच्या विविध पलूंवर सर्वंकष चर्चा होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती;  उद्योगतज्ज्ञांचेही मार्गदर्शन लाभणार

नागपूर : नागपूर व विदर्भातील उद्योजक ज्या परिषदेची आतुरतेने वाट पाहात आहेत ती सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह (परिषद) आज, बुधवारी ९ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या मिलेनियम हॉलमध्ये होत आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होईल. यात लघु व मध्यम उद्योगांच्या विविध पलूंवर सर्वंकष चर्चा होणार आहे.

या परिषदेला मुंबई शेअर बाजारचे लघु व मध्यम उद्योग विभाग प्रमुख अजय ठाकूर आणि उद्योग संचालनालय नागपूरचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. लघुउद्योगापुढील आव्हाने, समस्या आणि उपाय या विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.  यात सहभागी  निमंत्रित लघुउद्योजकांना उद्योगमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी असून उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींतून मार्ग निघण्याच्या दृष्टीने ही परिषद साहाय्यभूत ठरणार आहे. कार्यक्रमात प्रवेश फक्त निमंत्रितांनाचआहे.

प्रमुख सहभाग

लोकसत्ता ‘एसएमई’ कॉन्क्लेव्ह (परिषद) मध्ये बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (बीएमए) अध्यक्ष नितीन लोणकर, मॅन्युफॅक्चिरग इंडस्ट्रीज असोसिएशन एमआयडीसी िहगणाचे (एमआयए) अध्यक्ष कॅप्टन सी.एम. रणधीर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष अतुल पांडे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया इंडस्ट्रीजचे (सीआयआय) विदर्भ प्रमुख राहुल दीक्षित, दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डीक्की) अध्यक्ष निश्चय शेळके आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे (वेद) अध्यक्ष देवेंद्र पारेख आदी सहभागी होणार आहेत.

परिषद सारस्वत बँक प्रस्तुत असून पॉवर्ड बाय ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स (ओसीडब्ल्यू),मँगो हॉलिडेज आहे. हॉटेल सेंटर पॉईंट अ‍ॅण्ड रिसॉर्ट हे व्हेन्यू पार्टनर आहेत.

First Published on January 9, 2019 2:50 am

Web Title: industry minister subhash desai in loksatta sme conclave 2019