News Flash

आदिवासी भागात प्राणवायू ‘कॉन्सनट्रेटर’ संजीवनी ठरतोय

करोना महामारीच्या काळात प्राणवायूची गरज वाढल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेच्या एनएसएस पथकाचा उपक्रम

नागपूर : प्राणवायूच्या  कमतरतेमुळे एकीकडे करोनाबाधितांचे प्राण जात असताना दुसरीकडे आदिवासी भागात प्राणवायू पुरवठा  करण्याचा विडा उपराजधानीतील शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उचलला आहे. यासाठी एनएसएसच्या चमूने ऑनलाईन निधी संकलन करून आदिवासी भागामध्ये  तीन  प्राणवायू यंत्र (ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर) पुरवले आहेत. करोना महामारीच्या काळात प्राणवायूची गरज वाढल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ग्रामीण भागही यातून सुटला नाही.  गडचिरोली, चंद्रपूर या आदिवासी भागात तर अनेक रुग्ण अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि प्राणवायुच्या तुटवड्यामुळे  जीव गमावत आहेत. आज अनेक सामाजिक संस्था करोनामधअये  जमेल ती मदत करत असतानाच शासकीय विज्ञान महाविद्यालयाने अनोखा उपक्रम राबवत आदिवासी भागासाठी प्राणवायू यंत्र उपलब्ध करून दिले आहे. शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यासाठी ऑनलाईन

निधी संकलन करण्याची योजना आखली. ऑनलाईन माधअयमातून  दीड लाख रुपये गोळा केले. यातून पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी या गावात एक यंत्र

देण्यात आले.  या माध्यमातून करोनामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झालेले अनेक रुग्ण संपर्क साधत असून त्यांना मदत होते आहे. हे यंत्र  ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरले आहे.

हा उपक्रम हाताळणारे  एनएसएसचे प्रमुख डॉ. मालोजीराव भोसले यांनी आता दर पाच मिनिटाला प्राणवायू यंत्रासाठी  मागणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी काही यंत्र विकत घएत ते पुरवण्याचा संकल्प केला असून गडचिरोली आणि भंडारा असे दोन यंत्र पुरवण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. संजय ठाकरे यांच्यासह डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वजा गावंडे, गौरव निकम, संकेत जाधव काम करीत आहेत.

यांनी घ्यावा आदर्श

आज महाराष्ट्रात चार हजार तर देशात ३८ हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग आहेत. देशावर महामारीचे संकट आले असताना या प्रत्येक विभागाने अशाप्रकारे उपक्रम राबवल्यास एकट्या महाराष्ट्रात ४००० प्राणवायू  यंत्र उपलब्ध होतील, असा विश्वास एनएसएसचे प्रमुख डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:54 am

Web Title: initiative of the nss squad of the government justice aid science institute akp 94
Next Stories
1 प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला ‘नो हॉर्न डे’
2 कोविड केंद्राच्या नावाखाली रुग्णसेवेचा बाजार!
3 ‘एचआरसीटी’चे दर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे
Just Now!
X