भारतातील तीन व्याघ्र प्रकल्प वाघांविना; अनेक भागांत तुरळक संख्या

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष
नागपूर : व्याघ्र प्रकल्पांना मान्यता देणे ही अतिशय कठीण प्रक्रि या आहे. ती पूर्ण के ल्यानंतरच भारतात व्याघ्र प्रकल्पांना मान्यता देण्यात येते. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनात प्रशासन अपयशी तर ठरले नाही ना, असा प्रश्न भारतातील काही व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या आकडेवारीवरून उपस्थित होत आहे. भारतातील तीन व्याघ्रप्रकल्प वाघांविना आहेत,  पाच व्याघ्र प्रकल्पात केवळ एक वाघ आहे तर १७ व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या एकेरी आहे.

जोपर्यंत कोणत्याही क्षेत्रात वाघांसाठी सुरक्षित वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत वाघांसारख्या प्रजातीवर प्रयोग के ला जात नाहीत. हे वातावरण तयार होण्याआधीच प्रयोग झाले तर ते अपयशी ठरतात. भारतातील काही व्याघ्र प्रकल्पांच्या स्थितीवरून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने दर चार वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. २०१८च्या व्याघ्रगणनेच्या अहवालाने वाघांची संख्या वाढल्याचा आनंद दिला असतानाच, काही व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवरून अनेक (पान २ वर) (पान १ वरून) प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजस्थानमधील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पात के वळ एक वाघ आहे. २०१३ मध्ये येथे व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यानंतर २०१८ साली तेथे रणथंबोरमधून व रामगडमधून एक वाघ स्थलांतरित करण्यात आला. एक वाघ १५० किलोमीटरचे अंतर पार करून त्या ठिकाणी आला आणि वाघांच्या बछडय़ांसह या ठिकाणी वाघांची संख्या सातवर पोहोचली. दुर्दैवाने काही वाघांचा मृत्यू तर काही वाघ बेपत्ता झाले. आता या व्याघ्र प्रकल्पात के वळ एक वाघीण आहे. या व्याघ्र प्रकल्पात १६ गावे असून ऐच्छिक पुनर्वसनाची प्रक्रि या अतिशय संथगतीने सुरू आहे. याच राजस्थानमध्ये २०२१ मध्ये रामगड व्याघ्रप्रकल्प घोषित करण्यात आला. या व्याघ्र प्रकल्पात देखील एकच वाघ आहे. रामगडमध्ये आठ गावे असून येथे मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन होते. ओडिशातील सातकोसिया व्याघ्र प्रकल्पातही वाघांचे स्थलांतरण अयशस्वी ठरले. कारण त्या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष आहे. तुलनेने व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये अग्रेसर ठरली आहेत.

थोडी माहिती..

वाघांचे अस्तित्व, त्यासाठी पुरेसे खाद्य, अधिवास, संचारमार्ग या प्राथमिक, पण आवश्यक बाबींची पूर्तता होत असेल तर त्या ठिकाणाला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात येते.

शून्य वाघांची संख्या असणारे प्रकल्प

* झारखंड – पालामू * मिझोराम – डम्पा

* पश्चिम बंगाल – बक्सा

एकच वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प

* छत्तीसगड – उदनती सीतानदी

* ओडिशा – सातकोसीआ

* राजस्थान – रामगड

* राजस्थान – मुकूंद्रा हिल्स

* तेलंगणा – कावल