टपाल वितरण, गाडी खाली शिरून इंजिन दुरुस्ती, दररोज वेगवेगळ्या स्वभावाच्या प्रवाशांसोबत संवाद साधणारे बसवाहक, पॉवर लिफ्टिंग आणि जंगल गस्त .. खऱ्याअर्थाने हे पुरुष मक्तेदारीचे क्षेत्र.. परंतु या क्षेत्रातही पुरुषांची महिलांनीही आपले कर्तृत्व सिद्ध करत पुरुष मक्तेदारी मोडीत काढली आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून स्वकर्तृत्वाने या कामावर ठसा उमटवून आपली ओळख निर्माण करणाऱ्या या पाच महिला या त्याचीच साक्ष देतात.  तशा त्या आपल्यातीलच सर्वसामान्य पण वेगळ्या. महिला दिनानिमित्त त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न..

एक खडतर प्रवास..

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

aबीड जिल्ह्यतल्या परळी तालुक्यातील बारावी उत्तीर्ण झालेली एक मुलगी. जिला बोलण्याचा गंध नव्हता, माणसांच्या सहवासाची सवय नव्हती, पण नशिबाची चाके फिरली आणि अशा नोकरीत ती अडकली जिथे माणसांचा सहवास टाळता येत नव्हता आणि बोलण्यावाचून कामही होत नव्हते. आज गेल्या चार वर्षांत माणसांच्या आठ ते दहा तास ती अशा मानवी गोतावळयात वावरते आणि वाटेला जाणाऱ्या उपद्रवी माणसांना त्यांना समजेल अशा शब्दांच्या बाणाने घायाळ करते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करताना वर्षां गित्ते नावाची अशीच  एक तरुणी तेवढय़ाच ताकदीने उभी राहते.

मूळची बीड जिल्ह्यतल्या परळी तालुक्यातील वर्षां बारावी झाल्यानंतर एक वर्ष घरीच राहिली आणि सहज म्हणून तिने वाहक पदासाठी अर्ज भरला. परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाल्याने नागपुरात तिला नोकरीही मिळाली. कधी घराबाहेर पाऊल न ठेवलेल्या आणि घरच्यांव्यतिरिक्त इतरांसोबत बोलण्याची गरजच न पडल्याने घरापासून एवढे किलोमीटर दूर अंतरावर आल्यावर वर्षां थोडी बावचळली खरी. परंतु त्यातून ती सावरली.  नागपूर-आदिलाबाद हा लांब पल्ल्याचा प्रवास तिला करावा लागला. एसटीत पाय ठेवल्यानंतर प्रवाशांची अलोट गर्दी आणि त्यात प्रवाशांचा गोंधळ, वाहकाची उडणारी तारांबळ हा सर्व कधीकाळी प्रवाशी म्हणून अनुभवला होता. परंतु तोच प्रसंग स्वत:वर आल्यानंतर या परिस्थितीत जाणीव तिला झाली. तिकीट कापताना आणि पैशाचा हिशेब जोडताना तिला पहिल्याच दिवशी घाम फुटला. मात्र वाहकाच्या साथीने नोकरीचा हा पहिला दिवस कसाबसा पार पडला, असे ती सांगते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास तसा सुसह्य नाहीच. त्यातच प्रवाशांच्या अलोट गर्दीतून वाट काढत तिकीट कापणारे वाहक पाहिल्यानंतर प्रवाशांपेक्षाही त्या वाहकाचे होणारे हाल पाहून घाम सुटला नाही तर नवलच! सर्व प्रवाशांची तिकिटे कापायची, सुटय़ा पैशांचा गोंधळ सारायचा आणि हाती असलेली ‘कॅश’ सांभाळत पुन्हा जागेवर येऊन बसायचे. या सर्व गोंधळात प्रवाशांसोबत वादावादीचेही प्रसंग येतात. वाहकाच्या या भूमिकेत असलेली महिला हे सर्व कसे सांभाळत असेल, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. मात्र, वर्षां गित्ते ही तरुणी गेल्या चार वर्षांत या कामाला चांगलीच सरावली आहे. हे तिने सांगितलेल्या अनुभवातून त्याची जाणीव होते.

कॅश सांभाळणे कठीण 

चालकाला जसे ‘स्टेअरिंग व्हील’वर नियंत्रण ठेवावे लागते, तसेच वाहकालाही ‘कॅश’ सांभाळत एकएक पैशाचा हिशेब ठेवावा लागतो. या दरम्यान कधीकधी अधिकचे पैसे प्रवाशाकडे जातात. अशावेळी स्वत:चा खिसा रिकामा करावा लागतो. सुरुवातीचे काही महिने पाचपाचशे रुपये भरून द्यावे लागले, पण आता प्रवाशांच्या गर्दीतून वाट काढत पैशाचा हिशेबाला वर्षां सरावली आहे.

*****

..आणि जीव भांडय़ात पडला

लांबचा प्रवास करत असताना पुसदमध्ये मार्गातच बस बंद पडली. प्रवाशांची तर सोय करून दिली, पण आपले काय? यावेळी चांगलाच घाम फुटला. रात्र कुठे आणि कशी काढायची? कुठे जायचे तर दुसरे वाहन नव्हते. योगायोगाने भ्रमणध्वनी सुरू होता आणि मग जवळच्या एका नातेवाईकाला फोन लावला. बऱ्याच वेळानंतर ते येऊन पोहोचले आणि जीव भांडय़ात पडला.

*****

वेळप्रसंगी उत्तर देण्याची कला अवगत

अंबेजोगाईच्या प्रवासादरम्यान दारू प्यायलेला प्रवाशी शेजारी येऊन बसला. त्याने वाद घालायला सुरुवात केली, पण मुळातच वाद घालण्याची सवय नसल्याने त्यावेळी ते मुकाटय़ाने ते सहन केले. प्रवाशासोबत सुदृहदयाने वागा असे आम्हाला शिकवले जाते, पण प्रवाशी हद्द ओलांडत असेल तर अशावेळी त्यालाही त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची कला आता अवगत झाली आहे.

नोकरीच्या सुरुवातीला बरेच दिवस लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागला. सवय नसल्याने जेवणाचा डबा सोबत असूनही दिवसदिवस जेवण जात नव्हते. त्यातच आजारपण आले. उपाशी राहिल्यामुळे हिमोग्लोबीन, पांढऱ्या पेशी कमी झाल्या. दरम्यान, लांब पल्ल्याचा प्रवास थांबला. तरीही परवड थांबली नाही. रात्री कधीकधी उशीर होतो आणि घरी पोहोचण्यासाठी काहीच वाहन उपलब्ध नसते. अशावेळी जवळ राहणाऱ्या मैत्रीणीच्या घराचा सहारा घ्यावा लागतो. सरावाने आता ही सर्कस चांगली सांभाळता यायला लागली आहे.वर्षां गित्ते  

परिस्थितीशी लढण्याचा ‘संदेश’

cराजे महाराजांच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवायचा तर राजदरबारातला सेवक खलित्याच्या रूपातला तो निरोप घेऊन समोरच्या व्यक्तीकडे जात असे. दरम्यान, शिकाऊ कबुतराने संदेशाच्या आदानप्रदानाची ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आता काळ बदलला आणि संदेशाच्या आदानप्रदानाच्या पद्धतीत अनेक बदल झाले. त्यासाठी टपाल खाते नावाची नवी यंत्रणा तयार झाली. या यंत्रणेत पत्ररुपी संदेशवहनात मक्तेदारी पुरुषांचीच. मात्र, काळ बदलला आणि महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली. नागपुरातील खामला असो वा शंकरनगर, महिला पुरुषांच्या बरोबरीने पत्रवाटपाचे काम करतात. त्यातही शंकरनगरच्या टपाल खात्यातील विजया सावंत यांनी सुरुवातीच्या काळात पायी फिरून केलेले पत्रवाटपाचे काम म्हणजे कठीणच! सेवानिवृत्तीला आल्यानंतर त्यांच्या हाती दुचाकी आली, पण प्रवास मात्र तोच आहे.

हल्ली ‘ईमेल’ आणि इतर माध्यमातून संदेशवहनाचे काम होत असले तरीही टपाल खात्यातील ‘पोस्टमन’ काकांचे महत्त्व अजूनही तेच आहे. कारण प्रत्येकच प्रकारचा संदेश हा आधुनिक संदेशवहनाच्या यंत्रणेच्या माध्यमातून देता येत नाही. म्हणूनच महत्त्वाचे काही यायचे असेल तर ‘पोस्टमन’ काकाची वाट आतुरतेनेच पाहावी लागते. अतिशय जबाबदारीचे हे काम पुरुषच नव्हे तर स्त्रियासुद्धा अलीकडे लिलया पार पाडत आहेत. घराची बेल वाजल्यानंतर समोर ‘पोस्टमन’ नवे तर ‘पोस्टवुमन’ दिसून आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात. सुरुवातीला हे विजया सावंत यांना जसे वेगळे वाटत होते, तसेच ते लोकांनाही वेगळे वाटत होते. नंतर त्यांना लोकांची आणि लोकांना त्यांच्या पत्रवाटपाची सवय झाली.

विजया सावंत यांच्या राजे महाराजांच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवायचा तर राजदरबारातला सेवक खलित्याच्या रूपातला तो निरोप घेऊन समोरच्या व्यक्तीकडे जात असे. दरम्यान, शिकाऊ कबुतराने संदेशाच्या आदानप्रदानाची ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आता काळ बदलला आणि संदेशाच्या आदानप्रदानाच्या पद्धतीत अनेक बदल झाले. त्यासाठी टपाल खाते नावाची नवी यंत्रणा तयार झाली. या यंत्रणेत पत्ररुपी संदेशवहनात मक्तेदारी पुरुषांचीच. मात्र, काळ बदलला आणि महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली. नागपुरातील खामला असो वा शंकरनगर, महिला पुरुषांच्या बरोबरीने पत्रवाटपाचे काम करतात. त्यातही शंकरनगरच्या टपाल खात्यातील विजया सावंत यांनी सुरुवातीच्या काळात पायी फिरून केलेले पत्रवाटपाचे काम म्हणजे कठीणच! सेवानिवृत्तीला आल्यानंतर त्यांच्या हाती दुचाकी आली, पण प्रवास मात्र तोच आहे.

हल्ली ‘ईमेल’ आणि इतर माध्यमातून संदेशवहनाचे काम होत असले तरीही टपाल खात्यातील ‘पोस्टमन’ काकांचे महत्त्व अजूनही तेच आहे. कारण प्रत्येकच प्रकारचा संदेश हा आधुनिक संदेशवहनाच्या यंत्रणेच्या माध्यमातून देता येत नाही. म्हणूनच महत्त्वाचे काही यायचे असेल तर ‘पोस्टमन’ काकाची वाट आतुरतेनेच पाहावी लागते. अतिशय जबाबदारीचे हे काम पुरुषच नव्हे तर स्त्रियासुद्धा अलीकडे लिलया पार पाडत आहेत. घराची बेल वाजल्यानंतर समोर ‘पोस्टमन’ नवे तर ‘पोस्टवुमन’ दिसून आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात. सुरुवातीला हे विजया सावंत यांना जसे वेगळे वाटत होते, तसेच ते लोकांनाही वेगळे वाटत होते. नंतर त्यांना लोकांची आणि लोकांना त्यांच्या पत्रवाटपाची सवय झाली.

विजया सावंत यांच्या सेवानिवृत्तीला अवघी तीन वष्रे उरली आहेत, पण या खडतर प्रवासात त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील हास्य कायम आहे. कुटुंबात मुलीच असल्याने बारावीनंतर लागलीच त्यांचा विवाह घरच्यांनी उरकला. त्यांचे पती दिवं. सुरेश सावंत टपाल खात्यातच कार्यरत होते. नियतीला त्यांचे हे सुख मानवले नसावे आणि अवघ्या ३१व्या वर्षी त्यांच्या नशिबी वैधव्य आले. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा दहा वषार्ंचा तर लहान अवघा आठ वषार्ंचा होता. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी त्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवावे लागले. कधी घराबाहेर पडण्याची सवय नव्हती आणि घराबाहेर पडण्याचेच नव्हे तर घरोघरी संदेशवाटपाचे काम त्यांच्या हाती आले. पत्रवाटप म्हणजे हाती सायकल हवीच, पण सायकल तर येतच नव्हती आणि सायकल नव्हतीही. मात्र, परिस्थितीने सर्व शिकवल्याचे त्या सांगतात.

आणि सायकलीची जागा दुचाकीने घेतली

स्पीड आणि रजिस्टर पोस्ट या जेव्हाच्या तेव्हा पोहोचवावे लागते आणि पायी फिरून हे सर्व शक्यच नव्हते. सायकल तर येत नव्हती, पण पाच-सहा महिन्यात सायकल घेतली आणि शिकली. एका वर्षांत सायकलीने पत्रवाटप करू लागले आणि आज याच सायकलीची जागा दुचाकीने घेतली आहे. वयाच्या तिशीनंतर सायकल आणि आता वयाच्या पन्नाशीनंतर दुचाकी शिकले. मोठीमोठी ५ ते १० किलो वजनाची पार्सल दुचाकीने पोहोचवणे आता अधिक सोयीचे जाते.

सासूचे मोलाचे सहकार्य

पत्रवाटपाचे काम सुरू झाले तेव्हा मुले अगदी लहान होती. त्यामुळे त्यांना सोडून कामाला बाहेर जाण्यासाठी जीव धजावत नव्हता. मात्र, ही कामगिरी पार पाडण्यात सासूबाईंचे मोलाचे सहकार्य मिळाले. मुले मोठी होत असताना त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. त्यांचे अभियांत्रिकी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण करायचे तर पदरमोड करून ‘आरडी’ टाकण्यावाचून पर्याय नव्हता. मात्र, आज दोन्ही मुले उच्चशिक्षित असल्याचा अभिमान आहे.

जीवाची कसोटी

पत्रवाटपाची सुरुवात झाली तेव्हा साधी सायकलसुद्धा येत नव्हती. त्यामुळे काखेतल्या झोळीवजा थलीत सर्व पत्रे घेऊन पायी फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. कधीकधी मोठे पार्सलसुद्धा असायचे. काटोल रोडचा परिसर अतिशय दूर आणि दूरदूर अंतरावर पत्रवाटपासाठी जाताना जीवाची कसोटी लागली होती. सुरुवातीचे आठ दिवस प्रचंड त्रासाचे गेले. थकवा यायचा, त्रास व्हायचा, पण आता काम तेच असले तरी दिवस पालटले आहेत.

पडत्या काळात कुणी हात तर सोडाच पण बोट द्यायलाही तयार होत नाही. पतीच्या निधनानंतर सासुबाईंची मोलाची मदत झाली. त्यांनी धीर दिला आणि स्त्रीयांसाठी काहीशी वेगळी असलेली वाट यशस्वीपणे चालता आली. पायी फिरून पत्रवाटपाच्या अनुभवाने खूप काही शिकवले, पण आपण आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झालो हा अभिमान आहे

-विजया सावंत

कोणतीही भीती न बाळगता यशस्वी जबाबदारी

dजंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आणि ती यशस्वीपणे पार पाडणे हे इतके सोपे नाही. कारण येथे आक्रमक वन्यजीवांचाही सामना करावा लागतो आणि जंगलावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांचा विरोधही. या दोहोच्या कैचित अडकतो तो वनकर्मचारी. त्याचवेळी जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारीही पार पाडावी लागते. ही जबाबदारी आता पुरुष वनकर्मचारीच नव्हे तर महिला कर्मचारीसुद्धा तेवढय़ाच यशस्वीपणे पार पाडत आहेत. जंगलात काम करताना, पायदळ गस्त करताना आव्हाने तर आहेतच, सोबतच वन्यजीवांकडून होणाऱ्या हल्ल्याची भीतीही, तरीही गेल्या पाच-सहा वर्षांंपासून रूपाली भिंगारे-सावंत तेवढय़ाच तन्मयतेने ही जबाबदारी पार पाडत आहेत. आपल्याला वन्यजीवांपासून धोका वाटत असला तरी वन्यजीवांनासुद्धा आपल्यापासून धोका वाटतच असेल ना! मग जबाबदारी पार पाडण्यात हयगय कसली? हे त्यांचे वाक्य त्यांच्यातले धर्य अधारेखित करते.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देतादेता काही वर्ष उलटून गेली, पण त्यावेळी जंगल हेच आपले कार्यक्षेत्र असेल ते रूपाली सावंत यांनी निश्चित केले होते. २०१० मध्ये वनखात्याची जाहिरात आली आणि आलेली संधी सोडायची ती कशाला? असे म्हणून लगेच संधीचा फायदा घेतला. अभ्यासाला आवडीची जोड मिळाल्याने ही परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि २०१२ मध्ये बोर अभयारण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बोर अभयारण्यातच मुख्यालय असल्याने रूपाली सावंत यांना जंगलातच राहावे लागते. आता केवळ वनरक्षकच नव्हे तर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यालासुद्धा महिन्यातले अध्र्याहून अधिक दिवस जंगलात गस्त करावी लागते. ही गस्त कधी वाहनातून तर कधी पायदळ आणि वाहनातून गस्त  असली तरीही वन्यजीवांचा धोका असतोच. नोकरीवर रुजू झाल्यावर अवघ्या १५ दिवसात त्यांना वाघाने दर्शन दिले आणि अवघी रात्र जंगलात अडवून ठेवली.  ध्यानीमनी नसताना आणि एवढय़ा लवकर आपल्याला व्याघ्रदर्शन आणि तेसुद्धा यापद्धतीने होईल हे पचायला त्यांना बरेच दिवस गेले, पण म्हणूान जंगलातली गस्त त्यांनी कधी टाळली नाही.

..वाघांनीच काढता पाय घेतला

बोर अभयारण्यात गस्तीदरम्यान एका ठिकाणी कमरेपेक्षा अधिक गवत वाढलेले होते. त्याचठिकाणी आम्हाला मोजमाप आणि जीपीएस घ्यायचे होते. दोन वनरक्षकांच्या हातात मोजणी यंत्राची दोन टोके आणि मी जीपीएस घेत असताना वाघाने एकदम गवतातून उंच उडी घेतली. अनपेक्षितपणे अवघ्या दहा फूट अंतरावरच्या वाघाला पाहून सावरत नाही तोच पाठोपाठ दुसऱ्या वाघानेही त्याच पद्धतीने वरच्यादिशेने उडी घेतली. त्या वाघाची दिशा माझ्य़ाकडेच असल्याने जागीच स्तब्ध झाले. काय करावे हे सुचत नव्हते. मी तिथून काढता पाय घेण्याऐवजी वाघांनी तिथून काढता पाय घेतला.

वाघाने जीप अडविली

नोकरीवर रुजू होऊन अवघे पंधरा दिवसच झाले होते. रात्रीची गस्त सुरू होती आणि गस्तीदरम्यान वाघाने जीप अडवून धरली. काळोख्या रात्रीत जीपमध्ये आम्ही तिघेच आणि समोर वाघ. थोडय़ावेळात त्याचे बछडेही तिथे आले. त्यातला एक अगदी जीपच्या जवळ आला. त्यादिवशी अख्खी रात्र वाघ आणि आम्ही समोरासमोर होतो. या प्रसंगानंतर बरेच दिवस वाघ आपल्या इतक्याही जवळ येऊ शकतो हे पचतच नव्हते.

३०० गावकऱ्यांचा घेराव

अवैध गुरेचराईसाठी गावकऱ्यांना जंगलात प्रवेशबंदी केली असताना गावकरीही जिद्दीला पेटून उठले. त्यांना कितीही सांगितले तरी ते ऐकायला तयार नव्हते. आम्ही केलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून जंगलातच २००-३०० गावकऱ्यांनी वनरक्षकासह मला अडवून धरले. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर जंगलात चारही बाजूने त्यांनी त्यांची जनावरे घुसवली. आम्ही तीनचार लोक आणि गावकरी शेकडोच्या संख्येने होते.

जंगलातले रानकुत्रेही वाघापेक्षा आक्रमक असतात. एकत्र येऊन शिकार करण्याची त्यांची पद्धत असणाऱ्या अशा रानकुत्र्यांचा सामना  एकटय़ाने करावा लागला. जीपचा चालक, वनरक्षकासह त्यांना संरक्षण कुटीजवळच रानकुत्र्याची विष्ठा दिसल्याने  त्याचा मागोवा घेत तिघेही समोरसमोर चालत गेले. चालक आणि वनरक्षरक समोर निघून गेल्यानंतर  विष्ठा आणि इतर गोष्टीचे छायाचित्रण करीत होते. आपल्या मागे रानकुत्रे आहे याचे भानही  नव्हते. अचानक मागे वळलेल्या चालकाला ते दिसले आणि त्याने सावधानतेचा इशारा दिला. असे हे प्रसंग वनखात्याच्या नोकरीत येतच असतात.रूपाली भिंगारे-सावंत

यांत्रिकतेच्या कामात कर्तृत्वाचा अभिमान

eहाताला ग्रीस लागलेले, अंगावरचा निळा शर्टही ग्रीस आणि ऑईलने माखलेला. अशा अवतारात फक्त पुरुष यांत्रिक कामगाराचीच कल्पना करू शकतो. महिलांनी पुरुषांची अनेक क्षेत्रे काबीज केलीत हे खरे, पण वाहनाखाली जाऊन वाहनाची दुरुस्ती करणाऱ्या यांत्रिक कामगारांच्या रूपात महिलांची कल्पना करूच शकत नाही. मात्र, स्मिता कोटरंगे यांच्या हातात प्रवाशांच्या सुखरूप प्रवासाची एक दोरी आहे आणि यांत्रिक कामगार म्हणून आजवर त्यांनी त्यांची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे.

मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या स्मिता यांनी राजुऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून यांत्रिक कारागीर या विषयात शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी नोकरीचा विचार नव्हता आणि त्यामुळे नागपुरातून विवाहासाठी स्थळ सांगून आल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला. तब्बल सात वर्षे त्यांनी गृहिणी म्हणूान घरची जबाबदारी सांभाळली, पण वडिलांची इच्छा होती की मुलीने नोकरी करावी. सात वर्षांनंतर नोकरीची संधी चालून आली आणि त्याचीही वाट वडिलांनीच दाखवली. २००९ मध्ये नोकरीचे पत्र हाती आले आणि १८० दिवसांच्या प्रशिक्षणात पहिल्याच दिवशी मोठय़ा आव्हाचा सामना करावा लागला. त्यावेळी जीवावर बेतू शकणारा अनुभव होता.

दोन वर्ष नागपूर-चंद्रपूर अशा प्रवासासह कराव्या लागणाऱ्या नोकरीने त्यांना बरेच काही शिकवले. तब्बल साडेसहा वर्षे त्या सहाय्यक म्हणून बस आगारात कार्यरत होत्या. त्यावेळी वरिष्ठांच्या हाताखाली बस दुरुस्तीचे काम करावे लागत होते. आता त्यांच्या हाताखाली कामगार काम करतात. बसच्या हेडलाईटपासून तर रुपलाईटपर्यंत बसच्या खाली जाऊन दुरुस्तीचे काम करावे लागते. दररोज आगारात किमान २५ बस देखभाल दुरुस्तीसाठी येतात. यात बसेसची चाके बदली करणे, ग्रीस लावणे, त्यांचे ब्रेक सेट करणे अशी सगळी जोखमीची कामे येतात. त्यातही चाकांचे खिळे काढून चाके बाहेर काढणे आणि पुन्हा ते व्यवस्थित लावणे अधिक जिकरीचे आहे. बरेचदा ते निघत नाहीत तेव्हा ठोकून ठोकून काढावे लागतात. अशावेळी प्रचंड ताकद लागते आणि ही ताकद पुरुषांमध्येच असते. मात्र, स्मिता कोटरंगे यांनी पुरुषांची ही मक्तेदारी मोडीत काढली. हाताला लागलेले काळे ग्रीस आणि कपडय़ांवरच्या डागानिशी त्या बसखालून निघतात तेव्हा चेहऱ्यावर जराही त्रागा नसतो तर असते ते केवळ हास्य. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ही महिला हे काम करीत असेल, असा सुरुवातीला विश्वासच बसत नाही, पण त्या ते करतात हेही तेवढेच खरे आहे.

मुलांच्या चेहऱ्यांनी त्रास निघून जातो

कामाचे तास आठ असले तरीही वेळ बराच जातो. सकाळी सात वाजता आगारात पोहोचावे लागते. घरच्यांच्या सहकार्यानेच हे शक्य होते. आता मुले मोठी झाली आहेत. मुलगा आठव्या वर्गात तर मुलगी चौथ्या वर्गात आहे. मळकटलेले हात, अंगाला ग्रीस आणि तेलाचा वास तर कधी बसखाली गेल्यानंतर शरीरावर येणारे ओरबडे याचा त्रास होतो. मात्र, घरी मुलांचे चेहरे पाहिल्यानंतर हा सर्व त्रास दूर सारल्या जातो.

दोन वर्षे मुलीचा दुरावा

नोकरीला लागली तेव्हा मुलगी अवघ्या सव्वा वर्षांची होती आणि नोकरी चंद्रपुरात. त्यामुळे मुलीला चंद्रपुरातच बहिणीकडे ठेवले. सासर नागपूरचे असल्याने रोज नागपूरवरून येणेजाणे. २०११मध्ये तेव्हा नागपूर-चंद्रपूर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. जाण्यासाठी चार तास आणि येण्यासाठी चार तास असा आठ तासांचा प्रवास आणि आठ तासांची नोकरी. तब्बल दोन वर्षे हे सहन केले. मुलीला दोन वर्षे स्वत:पासून दूर ठेवावे लागले. आज मुलगी मोठी झाली, पण दोन वर्षे दूर राहिल्याचा त्रागा न करता तिला माझ्य़ा कर्तृत्त्वाचा अभिमान आहे.

राज्य परिवहन महामंडळात नोकरी लागल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी मोठय़ा अपघातातून बचावले. बसच्या खाली जाऊन सेल्फ लावत असतानाच अचानक बस मागे आली. क्षणभर धस्स् झाले. सोबत असलेल्या प्रशिक्षकांचीही तीच स्थिती होती, पण मागे आलेली बस दुभाजकाला अडकून थांबली आणि माझ्य़ासह प्रशिक्षकांनीही सुटकेचा श्वास सोडला.

-स्मिता कोटरंगे

२९ सुवर्णपदकांसाठी सामथ्र्य पणाला, तरी दुर्लक्षित

bपुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘पॉवर लिफ्टिंग’क्रीडा प्रकारात नागपूरच्या अलफिया शेखने इतिहास रचला. कोणाचेही विशेष पाठबळ नसताना केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर १९ वर्षीय अलफियाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर एकूण २९ सुवर्णपदके जिंकली. घरची परिस्थिती बेताची आणि राज्य शासनाचे कामगिरीकडे दुर्लक्ष यामुळे अलफियावर महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच खासगी व्यायामशाळेत नोकरी करण्याची वेळ आली आहे. शासन कधीतरी आपल्या कामगिरीची दखल घेईल अशी तिची अपेक्षा आहे. प्रतिभावान खेळाडू अलफियाच्या वाटय़ाला अगदी लहानपणापासून संघर्ष आला. तिचा हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे. तिच्या कुटुंबात वडील हारुल, आई मलिका आणि तीन बहिणी आजरा,आलिया व अमरिन आहेत. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या तिच्या वडिलांना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर घरीच किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. आई गृहिणी असून आजराचे लग्न झाले आहे. घरात सर्वात लहान असलेली अलफिया सध्या सक्करदरा येथील नागजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिक्षण घेत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मानाचा तुरा रोवणऱ्या अलफियाची अद्यापही सरकार, प्रायोजक वा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी दखल घेतलेली नाही. प्रत्येक स्पध्रेत सहभागी होण्यासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क, सराव आणि डाएटवर होणारा मोठा खर्च यासाठी तिला पदरमोड करावी लागते. गेल्या पाच वर्षांपासून ती प्रतापनगर येथील खासगी व्यायामशाळेत नोकरी करून तिची कामगिरी बजावित आहे. मात्र,अद्यापही तिच्याकडे सरकारचे लक्ष गेलेले नाही. व्यायाम करण्याच्या उत्कंठेत व्यायामशाळेत गेलेली अलफिया ‘पॉवर लििफ्टग’ या खेळाकडे आकर्षति झाली. अगदी सुरुवातीपासून लहान-मोठय़ा स्थानिक पातळीवरील स्पर्धा जिंकणाऱ्या अलफियाने अल्पावधीतच राष्ट्रीय व राज्य स्पर्धात मानाचे किताब पटकावले. कर्तृत्वाच्या जोरावर तिने राष्ट्रीय पातळीवर गरुडझेप घेतली असून स्थानिक स्पर्धासह राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये तिने सुवर्णपदकेच जिंकली आहेत, हे विशेष. तिने ‘पॉवर लिफ्टर’ खेळातील स्कॉट, बेंच प्रेस व डेड लिफ्ट या क्रीडा प्रकारात २९ सुवर्ण पदके मिळवली. यात राष्ट्रीय स्पध्रेत १८ तर राज्य पातळीवर ११ सुवर्ण पदकांचा समावेश असून तिने देशाचे नाव उंचावले. आíथक हातभारासोबतच समाजानेही तिच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सलग तीनवेळा सब ज्युनिअर गटात ‘स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया’ व ‘स्ट्राँग वुमन ऑफ  महाराष्ट्र’ असे मानाचे किताब पटकावलेली अलफिया ही कमी वयात कामगिरी करणारी देशातील पहिली खेळाडू आहे. गिट्टीखदान परिसरातील दशरथ नगरात राहणाऱ्या अलफियाच्या घरी ‘अठराविश्व दारिद्रय़’ असताना ती परिस्थितीशी झगडत नवनवे किताब पटकावत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. ती सध्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक पातळीच्या स्पध्रेच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी पुढील महिन्यात दिल्लीला पात्रताफेरी गाठायची आहे. मात्र घरात अठराविश्व्ो दारिद्रय़ असताना स्वत:साठी लागणारा जवळपास ३० हजार रुपये महिना असा खर्च तिला झेपणारा नाही. दोन सत्रात नोकरी आणि दोन सत्रात सराव करून तिला देशाचे नाव उंचवायचे आहे.

‘स्ट्राँगेस्ट टीन गर्ल ऑफ इंडिया’चा मान

नोव्हेंबर-२०१६ ला दिल्ली येथे ‘फिट लाईन इंटरनॅशनल एक्स्पो’मध्ये सुवर्णपदक अलफियाने मिळविले. डिसेंबरमध्ये ठाण्यात झालेल्या पश्चिम विभागीय ‘पॉवर लिफ्टिंग’मध्येही सुवर्णावर छाप सोडली. या स्पध्रेनंतरच नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावित‘स्ट्राँगेस्ट टीन गर्ल ऑफ इंडिया’चा तिने मान पटकाविला. विशेष म्हणजे, भारतातील कमी वयाची पहिली ‘पॉवर लिफ्टर’ ठरलेल्या अलफियाने संत्रानगरीचे नाव लौकिक केले. तिने ५६ किलो वजनगट सब जुनिअर, ११० किलो वजनगट स्क्वाट प्रकार, जुनिअर ५५ किलो वजनगट बेंच प्रेस आणि १४५ किलो वजनगट डेडलिफ्ट आदी स्पध्रेत सहभागी होत ३१० किलोग्राम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली.

भारतासाठी २९ सुवर्णपदके आणून देखील माझी दखल कोणीच घेतली नाही, याचे दु:ख वाटते. आज मला प्रायोजक मिळत नाही. स्पध्रेसाठी विदेशात जाण्याचा खर्च, दैनंदिन होणारा खर्च यासाठी शासनाने पुढे येणे अपेक्षित आहे. यंदा दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात जागतिक पातळीची स्पर्धा आहे अन् या स्पध्रेत मला चॅम्पियन बनायचे आहे, त्या दृष्टीने माझा सराव सुरू आहे. इतर देशात स्पर्धा झाल्या तर त्याची प्रसिद्धी या खेळाला विशेष मिळत नाही. मात्र, भारतात जर मी चांगली कामगिरी केली तर त्याचा सकारात्मक फायदा मला होऊ शकतो.

-अलफिया शेख