News Flash

गुलाबराव महाराजांचे तत्त्वज्ञान जगापुढे मांडण्याचे मी केवळ निमित्त ठरलो

 डॉ.  पेन्ना म्हणाले, मी मूळचा तेलंगणचा आहे. २००० साली नागपूरला नोकरीनिमित्त आलो.

साहित्य अकोदमीप्राप्त डॉ. मधुसूदन पेन्ना यांची कृतज्ञता; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला  सदिच्छा भेट

भारतीय तत्त्वज्ञानाचे महान चिंतक  प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या चरित्र व उपदेशांवर ‘प्रज्ञाचाक्षूसम’ हे संस्कृत महाकोव्य मी रचले. त्याला भारतीय साहित्य अकोदमीचा पुरस्कोर जाहीर झाला. परंतु हा गौरव केवळ माझा नाही तर तो संत गुलाबराव महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा आहे. महाराजांचे चरित्र्य आणि शास्त्र ‘प्रज्ञाचाक्षूसम’ या महाकाव्यातून जगापुढे मांडण्यासाठी मी एक निमित्तमात्र ठरलो, अशा कृतज्ञ शब्दात  डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी आपली भावना व्यक्त केली. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ.  पेन्ना म्हणाले, मी मूळचा तेलंगणचा आहे. २००० साली नागपूरला नोकरीनिमित्त आलो. तेव्हा मला मराठी समजतच नव्हती. त्यामुळे इकडच्या संतांविषयी मला फारशी माहिती नव्हती. पण, आईकडून लहानपणी मी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरांच्या कथा ऐकल्या होत्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकोराम आदी संतांनी महाराष्ट्राच्या सामाजिक , आध्यात्मिक  व साहित्य क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान दिले आहे.  या संत परंपरेतील एक  देदीप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या काव्याशी माझा परिचय एका संशोधक विद्यार्थ्यांच्या निमित्ताने झाला. संस्कृत विद्यापीठाचे तत्कोलीन कु लगुरू डॉ. पंक ज चांदे यांच्या प्रेरणेने हळूहळू मराठी बोलायला, लिहायला लागलो. दरम्यान, माझ्याक डे पीएच.डी. क रण्यासाठी एक  विद्यार्थी आला. त्याने ‘संत गुलाबराव महाराज’ हा विषय निवडला होता. तेथून गुलाबराव महाराजांचे चरित्र व उपदेशाचा अभ्यास सुरू झाला. त्या विद्यार्थ्यांची पीएच.डी. झाल्यानंतर दुसरा विद्यार्थी तोच विषय घेऊ न आला आणि त्यांच्यासाठी म्हणून गुलाबराव महाराजांचे ‘श्रीधरीयउच्चीष्टपुष्टी’ हा भागवतावरील व्याख्येचा ग्रंथ अभ्यासाला घेतला. तेथून त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी गोडी वाढली. महाराजांच्या विचारांशी जसजसा परिचय होत गेला तशी त्यांच्या विचारांची महती कळत गेली. त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान, शास्त्र जगासमोर मांडण्याचा आपणही प्रयत्न करावा या उद्देशाने  ‘प्रज्ञाचाक्षूसम’ हे संस्कृत महाकोव्य रचले  गेले. महाकोव्यात उपदेश नसतात. मात्र, मी महाराजांच्या चरित्रासोबतच त्यांचे तत्त्वज्ञानावर आधारित उपदेश समाविष्ट के ले. एकू ण ८५० श्लोकांच्या या महाकोव्यात ४५० श्लोक  चरित्राचे तर ४०० श्लोक  आणि १८ सर्ग(चॅप्टर) तत्त्वज्ञानाचे आहेत. महाराजांना अवघे ३४ वर्षांचे लौकि क  आयुष्य लाभले. या अल्प जीवनात महाराजांनी १३४ पुस्तके  लिहिली. त्यांनी डार्विन व स्पेन्सर यांच्या सिद्धांतावर भाष्य के ले. ज्ञानयोग, भक्तियोग, वेदांत, उपनिषदे, मानसशास्त्र, आयुर्वेद, ब्र:ह्मसूत्रे आदी विषयांवर लिखाण के ले. महाराजांचे तत्त्वज्ञान जगापुढे आणण्यासाठी आपण निमित्त ठरलो. आई भारतीदेवी हिचा प्रभाव असल्यामुळे एका छोटय़ाशा खेडय़ातून येऊन मी   साहित्य अकदमी पुरस्कारापर्यंत मजल मारू शकलो. हा महाराजांचा आशीर्वाद आहे, असेही डॉ. पेन्ना म्हणाले.

संस्कृतवर कुणाची मक्तेदारी नाही

संस्कृत ही विशिष्ट जातीची भाषा आहे, हा गैरसमज आहे. जे लोक  या भाषेवर स्वत:ची मक्तेदारी सांगतात ते चुकीचे आहे. आज हा भ्रम दूर व्हायला लागला आहे. वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, रामायण आदी रचना गैरब्राम्हणेत्तरांनीच के ल्या आहेत. मी संस्कृतमध्ये पीएच.डी. क रीत असताना, नेदरलॅण्डमध्ये संस्कृत प्रचारासाठी गेलो होतो. तेथे संस्कृतसंदर्भातील कोर्य भारतापेक्षा जास्त मोठे आहे. जर्मन लोक  तर संस्कृतला आपली मूळ भाषा मानतात आणि भारतीय वंश व जर्मन वंश हे एक च असल्याची त्यांची ठाम समजूत आहे, याकडेही पेन्ना यांनी लक्ष वेधले.

‘प्रज्ञाचाक्षूसम’चा जगातही गौरव

कॅनडामध्ये जुलै २०१८ ला संस्कृत भाषेवर आंतरराष्ट्रीय परिषद झाली. तेथे मला कुणी बोलावेल, अशी अपेक्षा मुळीच नव्हती. मात्र, अचानक माझ्या नावाची निवड झाली. परिषदेमध्ये काव्य आणि शास्त्र असे दोन विषय मांडायचे होते. मी गुलाबराव महाराजांचे तत्त्वज्ञान ही संकल्पना  मांडली. हे तत्त्वज्ञान लोकांना पटायला लागले. २०१८ ला डिसेंबर मध्ये हैदराबादला एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. तेथेही मी हाच विषय मांडला. २०१९च्या सुरुवातीला गुजरातच्या सोमनाथ ट्रस्टकडून संस्कृत पंडित म्हणून सुवर्ण पदक मिळाले. मग निरंतर भागवत आणि व्याख्यानामधून गुलाबराव महाराजांचे चरित्र लोकांपुढे मांडत राहिलो, असेही पेन्ना यांनी  सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:53 am

Web Title: interview loksatta office gulabrao maharaj akp 94
Next Stories
1 नववर्षांच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज
2 ‘तो’ वाघ आता परतीच्या प्रवासाला
3 प्रभारी अधिष्ठातापदाचा वाद पेटला!
Just Now!
X