27 September 2020

News Flash

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेळघाट रेल्वेचा विषय गाजणार!

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज पहिलीच बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यावरण आणि वन्यजीवांप्रती संवेदनशील असलेले राज्य सरकार शुक्र वारी होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वेलाईनबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत राज्य वन्यजीव मंडळाची ही पहिलीच बैठक आहे.

राज्य वन्यजीव मंडळाची १४ वी बैठक पाच डिसेंबर २०१८ ला तत्कालीन राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत पार पडली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर मंडळाची बैठकच झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याला करोनाचा विळखा बसल्याने मंडळाचे गठन झाले नाही. दरम्यान, आता एक-दीड महिन्यांपूर्वी मंडळ गठित झाले आणि मंडळाची १५ वी बैठक उद्या, शुक्र वारी होत आहे. सुमारे दीड वर्षांनंतर ही बैठक होत असल्याने आणि काही महत्त्वाचे विषय यात असल्याने या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अकोला ते खंडवा ही मीटरगेज रेल्वेलाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचा प्रस्ताव पाच एप्रिल २०१६ला झालेल्या अकराव्या बैठकीत आला होता. राज्य वन्यजीव मंडळ ते राष्ट्रीय वन्यजीव मंडळ आणि आता पुन्हा राज्य वन्यजीव मंडळ असा या रेल्वेमार्गाचा प्रवास चार वर्षांपासून सुरूच आहे. मेळघाट तसेच वन्यजीवप्रेमींनी या मार्गाला व्याघ्रप्रकल्पातून नेण्यास विरोध केला. हे प्रकरण न्यायालयात देखील गेले. राज्याचे सरकार पर्यावरण आणि वन्यजीवांप्रती संवेदनशील असल्याचा अनुभव गेल्या काही घडामोडींवरून आला. या रेल्वेबाबतही मुख्यमंत्री तसेच पर्यावरणमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवली. आता त्यांच्याच अध्यक्षतेत होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत हा विषय आल्याने यावर काय निर्णय होतो, निर्णय झालाच तर तो कु णाच्या बाजूने होणार, की निर्णय पुन्हा प्रलंबित राहणार याकडे सर्व वन्यजीवप्रेमी लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनानिमित्त वन्यजीवप्रेमींनी मेळघाटबाबत मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल मोहीम देखील सुरू केली आहे.

१२ विषयांवर चर्चा

शुक्रवारी होणाऱ्या राज्य वन्यजीव मंडळाच्या या बैठकीत तब्बल १२ विषयांवर चर्चा होणार आहे. यात मेळघाट रेल्वेसह चंद्रपूर जिल्ह्य़ातील ५० वाघांच्या स्थलांतरणाचा विषय देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाच्या ठाणे जिल्ह्य़ातून जाणाऱ्या पाचव्या टप्प्याचा विषय देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:11 am

Web Title: issue of melghat railway will be raised in the meeting of the state wildlife board abn 97
Next Stories
1 काँग्रेस मंत्र्यांमधील शीतयुद्ध विकोपाला?
2 नागपूरनगरीत ‘अयोध्येचा आनंद’!
3 Coronavirus : पुन्हा १५ बाधितांचा मृत्यू!
Just Now!
X